अमरावती विभागातील ३५ शिपाई झाले कृषी सहाय्यक

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

अमरावती विभागातील कृषी विभागातील विविध कार्यालयात शिपाई पदावर काम करणार्‍या ३५ कर्मचार्‍यांचे कृषी सहाय्यक गट क या पदावर पदोन्नती करण्याचे आदेश आज मंगळवारी कृषी सहसंचालक अमरावती सुभाष नागरे यांनी काढले आहे. त्यामुळे अनेक दिवसांची कर्मचार्‍यांची मागणी पुर्ण झाली आहे. कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिपायांचे कृषी सहाय्यक झालेल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील योगेश घनश्याम नागपुरे, रेवनसिद्ध सिद्धरामबाबा, लक्ष्मीकांत अशोक सवळी, प्रशांत अशोक कदम, गजानन नथ्थु खंडारे, महेश चंद्रकांत चित्ते, विशाल संतोष वाघ, किर्ती खंडुजी मेश्राम, दीपक देविदास भोलाने, स्वाती बाबुराव सुसर, सिमा उत्तमराव गवई, शुभांगी वसंतराव क्षीरसागर, वैशाली लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर लक्ष्मण देशमुख, दीपक गोविंद विणकर. अकोला जिल्ह्यातील अनिता रामभाऊ डाबेराव, निलेश पंजाबराव करसकार, मंदा छगन खुर्दे, मीना दामोदरराव ढाकूलकर. वाशिम जिल्ह्यातील उमेश बबनराव खोलगडे, सचिन साहेबराव दंडे, श्रीशैल प्रकाश शिंदे, अस्मिता माणिकराव सोळंके, प्रभाकर गोविंद झळके, रचना प्रकाश रिंढे. यवतमाळ जिल्ह्यातील राजेश नरसिंग चव्हाण, गजानन लक्ष्मण राऊत, दीपक देवराव इंगोले, गजानन संजय कमठेवाड. अमरावती जिल्ह्यातील शिवाजी मधुकर शिंगणे, अतुल बबनराव घोम, रवि शंकर चव्हाण, अवधुत आनंदराव निम्मलवाड, जीवन संजय अंधारे, अशोक मोतीराम मोहोरकार यांचा समावेश आहे.