रेल्वे अपघातात 36 गाईंचा मृत्यू, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

1
प्रातिनिधीक

 सामना ऑनलाईन । हमीरपूर

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात रेल्वे अपघातात 36 गाईंचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या दोन्ही बाजूला गाईंचे मृतदेह आढळले तेव्हा सर्व ग्रामस्थ तिथे जमा झाले. याची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली. तेव्हा प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खणून सर्व गाईंचे मृतदेह पूरले.

हमीरपूरच्या रगौल रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी 36 गाईंचे शव आढळले. तेव्हा ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. गोरक्षकांनी काही वेळ रेल्वे रोको केला आणि हा अपघात नसून घातपात असल्याचा संशयही व्यक्त केला.