36 वर्षीय महिलेने केला 9 वर्षांच्या मुलावर बलात्कार

106

सामना ऑनलाईन । कोच्ची

एका 9 वर्षांच्या मुलावर त्याच्याच नात्यातल्या 36 वर्षीय महिलेने बलात्कार केल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार तब्बल वर्षभर सुरू असल्याचंही उघड झालं आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील चैलारी येथे हे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीला आलं. तब्येतीच्या तपासणीसाठी दाखल झालेल्या या पीडित मुलाने आपल्या डॉक्टरला त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. डॉक्टरांनी त्वरित पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मुलाकडून घटनेची माहिती घेत त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्याच्या नातेवाईक महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ही महिला मुलाची नातेवाईक असून त्याच्या घराशेजारीच तिचं घर आहे. वैद्यकीय चाचणीत मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. आणि आरोपी महिलेनेही मुलावर अत्याचार केल्याचं कबूल केलं असून सुमारे वर्षभर ती त्याचं लैंगिक शोषण करत होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. यामुळे पीडित मुलाच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम झाला आहे.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असलं तरी या महिलेचा आणि पीडित मुलाच्या कुटुंबात वाद आहे. त्यामुळे या वादातूनच तिने हे कृत्य केलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या