तामिळनाडूमध्ये जल्लीकट्ट् खेळात ३७ जखमी

10
फोटो: पीटीआय

 

सामना ऑनलाईन। मदुराई

तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यात आज रविवारी जलिकट्ट् या खेळात ३७ जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति चिंताजनक आहे.या खेळात ९०० बैलांचा वापर करण्यात आला होता.

मदुराईतील अवानीपुरम येथे जलिकट्ट्चे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री आर बी उद्य कुमार आणि जिल्हाध्यक्ष वीर रागव राव यांच्या हस्ते जलिकट्टचे उदघाटन करण्यात आले.  या खेळात ९०० बैलांना नियंत्रणात आणण्यासाठी ७०० नागरिकांनी सहभाग घेतला होता. खेळ सुरु होताच बैलांना मैदानात सोडण्यात आले यावेळी त्यांना पकडण्यासाठी सगळेजण एकदम धावल्याने एकच गोंधळ उडाला. बेभान झालेल्या बैलांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणा-यांना ढुशी देऊन फरफटत नेले. यात ३७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मैदानामध्येच उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रामध्ये उपचार करण्यात आले.यात एकाची प्रकृति गंभीर झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जलीकट्ट् हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. जलिकट्ट् पोंगलच्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे.पण यावर्षी  जलिकट्ट्वरुन मोठा वाद उसळला.यामुळे सर्वाेच्च न्यायायालयाच्या आदेशामुळे हा खेळ पोंगलच्या दिवशी खेळला गेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या