राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू मुळे 39 जणांचा मृत्यू

48
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । जयपूर

उत्तराखंडपाठोपाठ राजस्थानमध्येही स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू मुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु हा सरकारी आकडा खोटा असल्याचे काही वर्तमानपत्रांचे म्हणणे आहे. दैनिक भास्कर ने दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 39 नसून 41 आहे. सरकारने दिलेल्या माहिती नुसार रुग्णांची संख्या 974आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी जयपूर, उदयपूर आणि जोधपूरमध्ये तीन लोकांनी स्वाईन फ्लू मुळे आपला जीव गमावला आहे. तर दुसरीकडे भाजपध्यक्ष अमित शाह यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली असून एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. उत्तराखंडमध्येही स्वाईन फ्लूने थैमान घातले असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या