सामूहिक बलात्कार करून तिला फासावर लटकवलं, पण…

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंगाचे प्रकारे वाढत असून अशीच एक घटना हरयाणामध्ये समोर आली आहे. एका महिलेवर ४ जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचवण्यात आले आहे. या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरयाणाच्या कैथल भागात एका महिलेवर ४ जणांनी लैंगिक अत्याचार, बलात्कार केले. तसेच महिलेला जीवे मारण्यासाठी म्हणून त्यांनी तिला फासवर लटकवून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या महिलेला वाचवण्यात आलं असून तिच्याकडून त्या चौघांची माहिती घेण्यात आली आहे. या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती, कैथलच्या महिला पोलीस अधीक्षक आस्था मोदी यांनी दिली.