नोटाबंदीनंतर ४८ तासात ४ हजार किलो सोन्याची विक्री


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर फक्त ४८ तासात ४ हजार किलो सोन्याची विक्री झाल्याचं समोर आलंय. काळा पैसा असलेल्यांनी त्यांचा पैसा सोनं खरेदी करून सुरक्षित केल्याचं सांगण्यात येत आहे. या सोन्याची किंमत १,२५० कोटी इतकी आहे. केंद्रीय उत्पादन संचालनालयाच्या गुप्तवार्ता विभागाने गोळा केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

८ नोव्हेंबरच्या रात्री नोटाबंदीचा निर्णय जाहीर होताच २ हजार किलो सोनं विकलं गेलं. दिल्लीतीन एका ज्वेलरने त्याच रात्री ७०० लोकांना ४५ किलो सोनं विकलं , याच ज्वेलरची ७ नोव्हेंबरला फक्त ८२० ग्रॅम सोन्याची विक्री झाली होती. चेन्नईच्या ललिता ज्वेलर्सनी ८ नोव्हेंबरलाच २०० किलो सोनं विकलं होतं. जयपूरच्या रावत ज्वेलर्सची ७ नोव्हेंबरची सोन्याची विक्री ही १०० ग्रॅम होती, मात्र ८ नोव्हेंबरला सोन्याची विक्री ३० किलो झाली होती. देशभरातील सोनं व्यापाऱ्यांची चौकशी केली जात आहे.