किडे आणि सरपटणारे प्राणी आवडले, चोराने पळवून नेले

सामना ऑनलाईन । फिलाडेल्फिया

फिलाडेल्फियातील एका कीटकांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संग्रहालयातून सुमारे ४० हजार डॉलर्स किंमतीच्या दुर्मिळ कीटकांची आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या संग्रहालयातील एका कर्मचाऱ्यानेच या प्राण्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. २२ ऑगस्टला किंवा त्याच्या आसपास संग्रहालायीतल सुमारे ९० टक्के दुर्मिळ प्राणी चोरीला गेल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संग्रहालायातील कर्मचाऱ्याने गणवेशातून काही प्राणी बाहेर नेले आहेत. या प्रकरणी पोलिसांना तीन संशयितांची माहिती मिळाली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चोरण्यात आलेल्या मेक्सिकन फायरलेग आणि टाँरटुलासह काही कीटक परत आल्याचे संग्रहालयाकडून सांगण्यात आले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. चोरण्यात आलेल्या कीटकांची बाजारात विक्री करण्यात आल्याची शक्यता संग्रहालयाचे प्रमुख डॉ. जॉन कँम्ब्रिज यांनी व्यक्त केली आहे. चोरीला गेलेल्या कीटकांची दुर्मिळ जाती परत मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.