डोंबिवली एमआयडीसी परिसर विकासासाठी 44 कोटी

4

सामना प्रतिनिधी । ठाणे

महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या डोंबिवलीतील एमआयडीसी परिसराच्या विकासासाठी शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला प्रचंड यश आले आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी येथे गटारांचे मजबूत जाळे उभारण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांवर पथदिवे बसवण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी सुमारे 44 कोटी रुपये खर्चून एमआयडीसी ही विकासकामे करणार आहे. त्यामुळे निवासी भागात राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कल्याण-डोंबिकली महानगरपालिकेमध्ये 27 गाकांसोबतच एमआयडीसी क्षेत्राचादेखील समाकेश करण्यात आला. येथील निवासी विभागातील रस्ते, गटारे व पथदिव्यांकरिता आमदार सुभाष भोईर सातत्याने पाठपुराका करीत होते. त्याला यश आले आहे. एमआयडीसीने गटारे व पथदिव्यांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यासाठी 44 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पत्र आमदार सुभाष भोईर यांना पाठवले असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरकळ, एमआयडीसी अधीक्षक अभियंता पंडितराव, कार्यकारी अभियंता ननावरे, महापालिका नगर अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रमिला पाटील, उपतालुकाप्रमुख विलास भोईर, युवासेना तालुका अधिकारी योगेश म्हात्रे, विभागप्रमुख सुखदेव पाटील, नेताजी पाटील, उपविभागप्रमुख अशोक पगारे, शाखाप्रमुख जयंता पाटील, सतीश पाटील, मुकेश पाटील, कैलास पाटील, चंद्रकांत उपाध्ये यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसी निवासी विगाची अतिशय दुरावस्था झाली असून या परिसराचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यानुसार पाठपुरावा सुरू असून त्याला यशही मिळत आहे. या भागातील गटारे व पथदिव्यांचे काम एमआयडीसीने हाती घेतले असून दोन महिन्यांत टेंडर निघणार आहे. त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.अशी माहिती आमदार सुभाष भोईर यांनी दिली आहे.