झिंबाब्वेच्या राजधानीत भीषण अपघात! दोन बसच्या समोरासमोर धडकेत 47 ठार

1

सामना ऑनलाईन । हरारे

झिंबाब्वेची राजधानी असलेल्या हरारे येथे दोन लक्झरी बसच्या अपघातात 47 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी हरारे-मुटारे मार्गावरील रुसपे भागात हा अपघात झाला आहे. एका बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या ही बस दुसऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ता पॉल न्याथी यांनी दिली आहे.

झिंबाब्वेमध्ये झालेल्या अपघातामुळे रुसपे मधील सरकारी रुग्णालयात जागा शिल्लक न राहिल्याने अनेक जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झिंबाब्वेमध्ये खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मागील जून महिन्यात देखील दोन बसचा अपघात होऊन 43 जणांचा बळी गेला होता.