इराणमध्ये 5.3 रिश्टर तीव्रतेचा भुकंप, तीन जण जखमी

502
प्रातिनिधीक फोटो


सामना ऑनलाईन । तेहरान

इराणच्या दक्षिण भागात रविवारी 5.3 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या भुकंपात तीन जण जखमी झाले. अमेरिका भौगोलिक सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजून 54 मिनिटांनी भुकंपाचे धक्के जाणवले.

भुकंपाचा केंद्रबिंदू होरमोजगन मधील काशम शहरात होता. इराणच्या सरकारी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एक 17 वर्षाच्या मुलीसह तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखले केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या भुकंपात 15 घरांचे नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या