महाभयंकर अपघात, पालघरजवळ ५ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन, पालघर

पालघरजवळ एक महाभयंकर अपघात झाला आहे. हरणवाडी इथे झालेल्या या अपघातात गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. पहाटेपासून या गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिकांची धडपड सुरू होती अखेर सकाळी सात वाजता हे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटली

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे – किरण पागधरे(वय-३० वर्षे), निकेश तामोरे (वय-२५ वर्षे), संतोष बहिराम(रा.पालघर) आणि चालक विलास वेताळ(वय-२५ वर्षे)