गणेशभक्तांवर काळाचा घाला, लांजाजवळ अपघातात 5 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर वाकेडजवळ झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इको कार आणि बसची धडक होऊन या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून राजापूरला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. अपघातामध्ये 7 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गणपती बाप्पा मोरया, चाकरमान्यांनू खड्डे मोजत या!

अपघातग्रस्त इको गाडीतून उपळकर आणि माजळकर या दोन कुटुंबांतील 11 जण राजापूर तालुक्यातील कोंडये गावात गणेशोत्सवासाठी चालले होते. त्यांच्या गाडीला लांजापासून जवळच असलेल्या वाकेड गावाजवळ सकाळी 11.30 च्या सुमारास अपघात झाला. एक खासगी प्रवासी बस आणि इको गाडी यांची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात इकोमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला तर बसमधील चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

अपघातातील मृतांची नावे पुढील प्रमाणे-

1. प्रियांका काशीराम उपळकर 29
2. पंकज हेमंत घाणेकर- 19
3. भार्गवी हनुमंत माजळकर- सहा महिने
4. मानसी हनुमंत माजळकर- 30
5. अद्याप ओळख पटलेली नाही.

अपघातातील जखमींची नावे-
1.मंगेश काशीराम उपळकर 26
2. लहू काशीराम उपळकर 18
3. अंकुश काशीराम उपळकर 18
4. हनुमंत शंकर माजळकर- 35
5. नितिन शांताराम जाधव (34, लग्झरी चालक)
6. संदेश शंकर कांबळे (21, क्लिनर)
7. प्रमोद प्रभाकर माजळकर

दरम्यान, वाहन चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच मोठी आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा -चंद्रकांत पाटील

आज झालेल्या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त चिंताग्रस्त झाले आहेत. गणपती बाप्पाचं नाव घेत, ‘तूच आम्हाला सुखरूप ने आणि परत आण’ अशी प्रार्थना करत गणेशभक्त त्यांचा जीव धोक्यात घालत या रस्त्याने प्रवास करीत आहेत.