मुंबईत 500 किलोमीटर रस्त्यांच्या कामाचा धडाका

सामना प्रतिनिधी , मुंबई

मुंबईकरांसाठी पालिका ऑक्टोबरपासून  507.62 कि.मी.च्या नव्या रस्त्यांची कामे करणार आहे. यामध्ये एकूण 1343 कामे केली जाणार असून 202.31 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामांची निविदा अंतिम टप्प्यात आहे. शिवाय पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आलेली 305.08 कि.मी. रस्त्याची कामेही 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना चकाचक रस्ते मिळणार आहेत. या कामांसाठी एकूण 1 हजार 508 कोटी 83 लाखांचा खर्च केला जाणार आहे.

मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर नियोजनबद्ध काम सुरू आहे. यामध्ये नव्या कामांसह पावसाळय़ात थांबवण्यात आलेली कामेही ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली. याव्यतिरिक्त 1 लाख 31 हजार 8 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाच्या जंक्शनची कामेदेखील ऑक्टोबरपासूनच टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन रस्त्यांच्या कामांसाठी एकूण 62 निकिदांची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून कार्यादेश दिले जातील.

-1 ऑक्टोबर 2016 ते 31 मे 2018 या 20 महिन्यांच्या कालाकधीत पालिकेने 552.71 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. याक्यतिरिक्त 2 लाख 88,278 चौ.मी. क्षेत्रफळाचा जंक्शन कामांचाही पूर्ण झालेल्या कामांमध्ये समावेश आहे.

-पाकसाळा संपल्यानंतर होणाऱ्या कामामध्ये 202.31 कि.मी. लांबीच्या 624 रस्त्यांची कामे नव्याने हाती घेण्यात येणार आहेत.

-पूर्व उपनगरातील 47.89 कि.मी. लांबीच्या 155 रस्ते कामांचा यात समाकेश असून उर्वरित 108.26 कि.मी. लांबीचे रस्ते हे पश्चिम उपनगरांमधील आहेत.