बापरे बाप ! 75 वर्षीय आजोबांच्या किडनीतून काढले तब्बल 550 मुतखडे

10


सामना ऑनलाईन । डोंबिवली

डोंबिवलीत राहणाऱ्या एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या किडनीतून एक- दोन नव्हे, तर तब्बल 550 मुतखडे काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. काही दिवसांपासून सतत पोटात दुखत असल्याने आजोबा उपचारासाठी डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात गेले. मात्र त्यांची तपासणी केल्यावर डॉक्टर देखील चक्राऊन गेले. आजोबांच्या उजव्या किडनीमध्ये तब्बल 550 मुतखडे असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून सर्व मुतखडे  बाहेर काढले.

डोंबिवलीतील एसआरव्ही ममता रुग्णालयात या आजोबांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या किडनीतून 550 मुतखडे बाहेर काढले. रुग्णाच्या ओटीपोटात काही दिवसापासून वेदना होत होत्या. मात्र आजाराचे योग्य निदान होत नव्हते. त्यामुळे अल्ट्रासाउंड आणि सीटी स्कॅन केल्यानंतर मुतखडे झाले असल्याचे लक्षात आले.  त्यासाठी तातडीने मिनिमल इन्व्हेसिव्ह होल सर्जरीद्वारे 550 मुतखडे बाहेर काढले. ही शस्त्रक्रिया दीड तास चालली. सध्या या आजोबांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या