महापालिकेत अभूतपूर्व राडा, पोलिसांनी MIM च्या 6 नगरसेवकांना उचलून नेले

86

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

संभाजीनगर महानगरपालिकेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा प्रस्ताव न मांडल्याने एमआयएमच्या नगरसेवकाने राजदंड पळवला. यानंतर पाण्याच्या मुद्दावरूनही गोंधळ झाला असून, या दोन कारणांसाठी एमआयएमच्या 6 नगरसेवकांना 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे.यानंतरही या नगरसेवकांनी गोंधळ घालणे सुरू ठेवल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. सिटी चौक पोलिसांनी सभागृहात दाखल होत या गोंधळी नगरसेवकांना उचलून बाहेर नेले.

या गोंधळानंतर शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी घडलेल्या घडनेचा निषेध नोंदवला आणि गोंधळ घालणाऱ्या 20 नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. उपमहापौर विजय औताडे यांनी मांडलेल्या या प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर तातडीने कारवाई करावी अशी विनंती करत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सभागृहाचे आजचे कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्या विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. एमआयएमने मात्र इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा प्रस्ताव मांडण्यात यावा अशी मागणी केली होती. ही मागणी केल्यानंतर सभागृहात गोंधळ झाला आणि या गोंधळादरम्यान एमआयएमच्या नगरसेवकाने राजदंड पळवला.

ज्या 20 नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

 • खान फेरोज मोईनुद्दीन
 • प्रकाश एडके
 • सिद्दीकी नासेर तकीउद्दीन
 • नाईकवाडी अब्दुलरहीम शेख
 • जमीर कादरी अहमदरहीम अहमद
 • आबू हाशमी
 • आझिम अहमद रफीक
 • लता निकाळजे
 • खान इरशाद इब्राहीम
 • खान सायराबानो अजमल
 • सखत बेगम आरेफ हुसैनी
 • शेख नर्गिस सलीम
 • खान नसरीन बेगम समद यारखान
 • नसीब बी सांडू खाँ
 • सलीमा बाबूभाई कुरेशी
 • तसनीम बेगम अब्दुल रऊफ
 • गंगाधर ढगे
 • पठाण अस्मा फिरदोस रफीक पठाण
 • शेख जफर अख्तर
 • सरीता बोर्डे

 

आपली प्रतिक्रिया द्या