‘गुदांग गरम’ सिगारेटचा सहा कोटींचा साठा पकडला

सामना ऑनलाईन । मुंबई

भिवंडीमधील एका गोडाऊनमध्ये डीआरआयच्या पथकाने छापा टाकून ‘गुडंग गरम’ सिगारेटचा सहा कोटींचा साठा पकडला. हा सर्व साठा परदेशातून तस्करी करून आणल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ‘गुदांग गरम’ या सिगारेटला फ्लेवर आणि इतरपेक्षा शरीरारास कमी घातक असल्याने विशेष मागणी आहे. परंतु सर्व कर भरून परदेशातून मागवली तर तीची जास्त दराने विक्री करावी लागते. हे टाळण्यासाठी या सिगारेटची अरब अमिरात, मलेशिया आणि सिंगापूर या देशातून तस्करी केली जाते. या रॅकेटमधील मास्टरमाइंड फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.