विहिरीत पडलेल्या 6 महिन्याच्या बिबट्याची सुखरूप सुटका

सामना ऑनलाईन । आंबेगाव

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे विहिरीत पडलेल्या 6 महिन्याच्या बिबट्याची सूटका करण्यात आली आहे. भक्षाच्या शोधात असताना  बिबट्या विहिरीत पडला असावे असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. माणीकडोह बिबट निवारा केंद्र आणि  मंचर वनविभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

गुरुवारी सकाळी पोंदेवाडी येथे विहिरीत बिबट्या पडल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे याबाबतची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला दिली. घटनेची माहीती मिळताच वनविभाग आणि बिबट निवारा केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. तसेच त्याला माणीकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र या बिबट्याची त्याच्या आईबरोबर भेट करून देण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.