देशाची राजधानी हादरली, सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाची राजधानी दिल्ली ही महिलांसाठी असुरक्षित होत चालली असल्याच समोर आलं आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर तिच्या शाळेतील वायरमनने बलात्कार केल्याच उघड झालं आहे. पीडित मुलीने तिच्यासोबत झालेल्या छळाची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून आरोपीने तिला फूस लावून पळवलं आणि शाळा परिसरातील गोल मार्केट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हा तिच्या शाळेत वायरमननचे काम करतो. बुधवारी रात्री पीडित मुलीची तब्येत अचानक खराब झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर तिने झालेल्या प्रकाराबद्दल सर्व हकिकत कुटुंबीयांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आणि त्या आधारावर आरोपीला अटक केली.