जेट एअरवेजचे 500 कर्मचारी स्पाईसजेटच्या पंखाखाली

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बंद पडलेली जेट एअरवेज कंपनीचे कर्मचारी स्पाईसजेटमध्ये रुजु झाले आहे. स्पाईजेटने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत 100 वैमानिक आणि 400 कर्मचारी स्पाईसजेटमध्ये रुजु झाले असून अधिक कर्मचार्‍यांची भरती केली जाईल असेही स्पाईसजेटने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जेट एअरवेज ही कंपनी डबघाईला आली होती. कर्मचार्‍यांनी सरकारकडेही गळ घातली. अखेर बँकांनीही हात वर केल्याने कंपनी बंद पडली आणि अनेक कर्मचारी एका रात्रीत रस्त्यावर आले. त्यानंतर स्पाईसजेटने मदतीचा हात पुढे करत 100 वैमानिकांना नोकरी दिली. तसेच 200 केबिन कर्मचारी व 200 तांत्रिक आणि विमानतळ कर्मचारीही स्पाईसजेटमध्ये रुजू झाले आहेत.

स्पाईसजेटमध्ये अजून कर्मचार्‍यांची भरती केली जाईल असे स्पाईसजेटने म्हटले आहे. तसेच अधिकाधिक प्रवाशांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे.