636 पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक पदाची शिफारस, 11 पोलीस नांदेड जिल्ह्यातील

4

सामना प्रतिनिधी । नांदेड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विभागीय परीक्षा स्तरातील 636 पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक करण्यासाठी शासनाकडे शिफारस केली आहे. या 636 मध्ये 11 पोलीस नांदेड जिल्ह्याचे आहेत. त्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पण समावेश आहे.

मागील वर्षी पोलीस विभागीय परीक्षा झाल्या. राज्यभरातील 636 निवडक निवड झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाकडे पोलीस उपनिरीक्षक पदावर या लोकांना घेण्यासाठी केली आहे. त्यात नांदेडचे बारा जण आहेत.

नांदेड येथून पोलीस उपनिरीक्षक या विभागीय परिक्षेत निवड झालेल्या 12 ज्ञानोबा किशनराव कवठेकर बकल नं.1243, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण, वैजन्नाथ परमेश्वर अनंतवार बकल नं.2465 नेमणूक दशतवाद विरोधी पथक, पंकज उत्तमराव इंगळे बकल नं.2395 वाहतूक शाखा नांदेड शहर, नारायण रामभाऊ घोडके बकल नं.3119, वजिराबाद पोलीस ठाणे, बालाजी कदम, मुदखेड पोलीस ठाणे, शंकर मोहनराव याबाजी बकल नं.3046, महामार्ग पोलीस, तानाजी व्यंकटराव पाटील बकल नं.322 पोलीस ठाणे बिलोली, गणेश सुधाकर शेळके बकल नं.3047 पोलीस मुख्यालय नांदेड, शिवानंद नागनाथराव कानगुले बकल नं.2866 नेमणूक मुदखेड पोलीस ठाणे, जायभाये, वाहतूक शाखा, माधव बापूराव गुट्टे बकल नं.2856 महामार्ग पोलीस, आशा गणपतराव नरळे, पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड या सर्व निवड झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी 232 ते 248 असे गुण संपादन केले आहेत.

निवड झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन, पोलीस उपअधीक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे, अभिजित फस्के, सिध्देश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, संदीप शिवले, चंद्रशेखर चौधरी, प्रदीप काकडे, अनिरुध्द काकडे यांच्यासह असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.