शेतकर्‍याचा धारदार शस्त्राने वार करून खून, श्वान पथक ठरले अपयशी


अर्शद खान । जळगावजामोद (बुलढाणा)

बुलढाणा तालुक्यातील सुनगाव येथे रात्री शेतामध्ये धारदार शस्त्र डोक्यावर मारुन शेतकर्‍याचा खून झाला. खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, श्वानपथक व फॉरेन्सीक युनिट दाखल झाले. मधुकर सखाराम कापरे (65) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मधुकर कापरे या शेतकऱ्याचा त्यांच्याच शेतात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी मृताचा मुलगा पांडुरंग मधुकर कापरे याने पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपींविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके व नापोका राजु टेकाळे, गणेश पाटील हे करीत आहे.

श्वान पथक अपयशी
दरम्यान, खुनाची माहिती मिळाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्य़ासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले. परंतु श्वानपथकाला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि ते तेथेच घुटमळत राहिले. पोलीस पुढील तपास करत आहेत.