आसाममध्ये विषारी दारूच्या बळींची संख्या 69 वर, दोघांना अटक

सामना ऑनलाईन । गोलाघाट  

आसाममध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये गोलाघाटमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी मृतांचा आकडा 17 होता. शुक्रवारी हा आकडा वाढून 32 झाला होता. परंतु आता यात अजून लोकांचा मृत्यू झाला असून तो 69 पर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी देवेने बोरा आणि इंद्रकोल्पो बोरा या दोन आरोपींना अटक केली आहे.

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात चहाच्या बागेत विषारी दारूच्या सेवनाने ३२ जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इस्पितळात 32 मृतदेश होते. आधी मृतांची संख्या 17 होती. ती वाढत 69 पर्यंत पोहोचली आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्री एका दुकानदाराकडून लोकांनी दारू विकत घेतली. ती दारू प्यायल्यानंतर अनेक जण आजारी पडले आणि त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले. अजूनही काही लोकांना उपचारासाठी दाखल केले नसल्याचे काही जणांनी सांगितले.