महामार्गावर 12 गाड्यांची एकमेकांना भीषण धडक, सात जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मथुरा

उत्तर प्रदेशमध्ये 12 गाड्यांची एकमेकांना भीषण धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मथुराजवळ यमुना एक्सप्रेस वे वर हा भीषण अपघात झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी रुग्णावाहिका नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर महामार्गावरील 12 गाड्यांवर जाऊन आदळली. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.