सात वर्षीय चिमुरड्याची कोटीच्या कोटी उड्डाणे, यूट्यूबद्वारे 155 कोटींची कमाई

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सात वर्षाचं वय म्हणजे खेळण्या-बागडण्याचे आणि मजा करण्याचे दिवस. ना अभ्यासाचा ताण ना कामाचे टेन्शन ना भविष्याचा काही विचार. परंतु याच वयात एक चिमुरडा कोट्यवधी रुपये कमवत असेल तर… आश्चर्य वाटले ना. रेयान असे या चिमुरड्याचे नाव असे तो यूट्यूबच्या माध्यमातून थोडथोडके नव्हे तर 155 कोटी (दीड अब्ज) रुपयांची कमाई करत आहे. कमाईच्या बाबतीत त्याने अनेक मोठ्या यूट्यूबरर्सला पछाडले आहे.

रेयान याचे एक यूट्यूब चॅनेल असून तो या चॅनेलवर बाजारात नव्याने दाखल झालेल्या खेळण्यांचा रिव्हू देतो. रेयान आपल्या घरात खेळण्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ बनवतो आणि त्याचे कुटुंबीय तो त्याच्या चॅनेलवर अपलोड करतात. या व्हिडीओत रेयानसोबत त्याचे कुटुंबीयही दिसतात. परंतु त्याने आपले संपूर्ण नाव अद्याप सांगितलेले नाही.

ryan2

यूट्यूबवर या छोठ्या यूट्यूबरचे 1 कोटी 73 लाख फॉलोअर्स आहेत. चॅनेल लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 26 अब्ज लोकांनी त्याचे व्हिडीओ पाहिले आहेत. याद्वारे त्याने एका वर्षात 155 कोटींची कमाई केली. फोर्ब्सने नुकत्याच यूट्यूबर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची यादी जाहीर केली. यात हा चिमुरडा सर्वात वर आहे. व्हिडीओवर चालणाऱ्या जाहिरातींद्वारे रेयानने 147 कोटी कमावले आहेत तर इतर पैसे त्याला स्पॉन्सर पोस्टद्वारे मिळाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी रेयान या यादीत नवव्या क्रमांकावर होता. गेल्या वर्षी त्याची कमाई ही 71 कोटी रुपये होती.

ryan

आणखीही बरेच उद्योग
रेयान फक्त एक यूट्यूबर नाही तर सेलिब्रिटीही आहे. तो ‘पॉकेट डॉट वॉच’ नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसोबत मिळून काम करतो. त्याचे आवडते कपडे आणि खेळणी रेयान्स वर्ल्ड नावाचे विकले जातेत. अमेरिकेची दिग्गज कंपनी वॉरमार्टच्या स्टोअरमध्ये त्याचे हे प्रोडक्ट विकले जातात. याद्वारेही तो कमाई करतो.