बिबट्याच्या हल्लात ७० वर्षीय आजी जखमी

सामना ऑनलाईन । नगर

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय वृद्ध महिला जखमी झाली आहे. गंगूबाई काशिनाथ नवले असं जखमी महिलेचं नाव आहे. शनिवारी सकाळी टॉयलेमध्ये लपून बसलेल्या बिबट्याने या आजींवर हल्ला केला.

बिबट्या रात्रीच्या वेळी टॉयलेटमध्ये अडकला असल्याच शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी उठल्यानंतर आजींनी टॉयलेटचा दरवाजा उघडल्यावर अचानकपणे बिबट्याने आजींवर हल्ला केला. मात्र न घाबरला आजींनी आरडाओरडा केल्याने बिबट्यानं तेथून पळ काढला. मात्र हल्ल्यात बिबट्यानं आजींच्या डोक्यावर पंजा मारल्यानं आजी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अकोले येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.