यूपीतील सरकारी रुग्णालयामध्ये 71 बालकांचा मृत्यू


सामना ऑनलाईन । लखनौ

भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात गेल्या दीड महिन्यात 71 बालकांचा बहराईच येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. त्या रुग्णालयात विविध आजारांमुळे त्या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डी. के. सिंग यांनी त्या माहितीला दुजोरा दिला आहे.