हैदराबाद डेक्कन एक्स्प्रेसमधून हवाला रॅकेटचे 71 लाख जप्त

सामना प्रतिनिधी । मुंबई

हैदराबादहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलेल्या एका एक्स्प्रेसमध्ये छापा टाकून आरपीएफने हवाला रॅकेटमधून आलेली लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे. मुंबई आणि हैदराबाद अशा दोन्ही ठिकाणांवरून एकूण सुमारे 71 लाख रुपयांची रोख रक्कम गुरुवारी जप्त करण्यात आली. हैदराबाद स्थानकातून बुधवारी रात्री सुटणाऱया गाडी क्र. 17032मध्ये हवाला व्यवहाराची रक्कम असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलास (आरपीएफ) मिळाली. या दोन्ही यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून 66,50,00 रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. पण ही गाडी सुटत असल्याने ही एक्स्प्रेस मुंबईत येताच सीएसएमटी येथे आरपीएफने पार्सलची तपासणी करून उर्वरित पाच लाख हस्तगत केले.