मगरीने लाडक्या शिंगरूची केली शिकार, महापौरांनी असा घेतला बदला


सामना ऑनलाईन । टेक्सास

मानवांचे आपल्या पाळीव प्राण्यांवर किती प्रेम असते याची प्रचिती टेक्साकमधल्या नागरिकांना आली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ७३ वर्षीय जुडी कोचरन यांच्या एका लाडक्या शिंगरूची शिकार एका २५० किलो वजनाच्या मोठ्या मगरीने केली होती. त्याचा बदला म्हणून कोचरन यांनी एका गोळीत या मगरीला यमसदनी पाठवले. कोचरन आजी टेक्सासमधील एका पालिकेच्या महापौर आहेत

जुडी कोचरन यांचे शिंगरू एकाएकी गायब झाले. तपासानंतर एका १२ फुटी मगरीने त्याची शिकार केल्याचे कळाले. तीन वर्ष या आजीने या मगरीला शोधून काढले. या मगरीच्या शिकारीसाठी त्यांच्या जावायाने मदत केली. ही मगर सापडल्यानंतर एका  गोळीत आजीने या मगरीला कंठस्नान घातले.

या मगरीचे वजन तब्बल २६३ असून ती १२ फुटांची होती. आजी टेक्सासमधील एका पालिकेच्या महापौर आहेत. या मगरीला २० दिवसांच्या आतच मारणे गरजेचे होते कारण टेक्सासमध्ये दरवर्षी १० ते ३० सप्टेंबरदरम्यान शिकार करणे कायदेशीर असते. नेमक्या जागी पकडून नेम धरून या ७३ वर्षाच्या आजीने या मगरीला मारले. आता या मगरीचा मृतदेह आपल्या कार्यालयाच्या बाहेर जतन करण्याचा विचार या आजीबाई करत आहेत.