थायलंडमधील थामलाँग गुहेत अडकलेल्या आठ जणांची सुटका

सामना ऑनलाईन, बँकाँक

थायलंडच्या थामलाँग गुहेत दोन आठवड्यापासून १२ फुटबॉल खेळाडू आणि त्यांचा कोच अडकले आहेत. त्यापैकी आठ जणांना बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले आहे. सोमवारी सकाळी ९० पाणबुडय़ांनी बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेत चार जणांची सुटका करण्यात आली. रविवारी राबवलेल्या मोहिमेत चार मुलांची सुटका करण्यात आली होती. त्यामुळे एकूण आठ जणांची सुटका झाली असून उरलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यासाठी आज सकाळी मोहीम परत सुरू करण्यात येणार आहे. २३ जूनला साहसी मोहिमेसाठी ११ ते १६ वायोगटातील मुले त्यांच्या २५ वर्षांच्या कोचसह थामलाँग गुहेत आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे गुहेत पाणी शिरल्याने ते सर्व दोन आठवडय़ापासून गुहेत अडकले होते.