राज्यातील 800 अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर

2
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

पोलीस दलात विविध स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली आहे. अशा या कर्तबगार अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर झाले असून ते येत्या महाराष्ट्रदिनी सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे.

यामध्ये मुंबई पोलीस दलातील उपायुक्त मंजुनाथ सिंगे, वसंत जाधव, डॉ. मोहन दहिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भरगुडे, किरण पाटील, संगीता अल्फान्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, पोलीस निरीक्षक पांडुरंग सणस, संतोष सावंत, सागर शिवलकर, प्रकाश बागल, ज्ञानेश्वर आवारी, विनोद तावडे, रईस शेख, सुधाकर देशमुख, नितीन पाटील, प्रमोदकुमार कोकाटे, जीतेंद्र मिसाळ, कन्हैया थोरात, अनिल ढोले या अधिकाऱ्यांसह सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, नाईक व शिपाई यांचा समावेश आहे. 1 मे 2019 रोजी महाराष्ट्रदिनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे.