संभाजीनगरमध्ये टँकर-अ‍ॅपेची टक्कर, ९ जण ठार

2

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर-पैठण रोडवरील गेवराई तांड्यावर टँकर व अ‍ॅपेरिक्षाची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

रेल्वेस्टेशनकडून चितेगावकडे जाणारी अपेरिक्षा (एमएच २० डीसी ४२६७) व चितेगावहून संभाजीनगरकडे जाणारा टँकर (एम.एच.१५- ८४०) यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात ९ जण ठार झाले. यामध्ये चितेगाव, बिडकीन व पांगरा येथील रहिवाशांचा समावेश आहे. या अपघातात शेख अमीर शेख मक्सूद (२२, रा. जुना पोस्टऑफीस) शेकू त्रिंबके (७५, मातोश्री वृध्दाश्राम), शिवलालसिंग गुलाबसींग ठाकूर (८४), जनार्धन नाथा अवचरमल (४८, चितेगाव), अमृता सुनील अवचरमल (११), श्यामकुमारी प्यारेलाल ठाकूर (६०, बिडकीन), राममहेश प्यारेलाल ठाकूर (४८) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.