अंत्ययात्रेवर पडली वीज, 9 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । कानपुर

उत्तर प्रदेशात वीज पडल्याने एकच हाहाकार उडाला आहे. शुक्रवारी हरदोईच्या मंसुरपूर येथे एका अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर वीज पडल्याने काही कळायच्या आतच 9 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

अरवल पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मंसुरपूर गावाचे सरपंच सुशील अवस्थी यांचा मुलगा सौरभ अवस्थीचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. शुक्रवारी सौरभचा मृतदेह अंत्यविधीसाठी कुसुमखोर घाटाकडे नेत असताना वाटेतच अचानक अंत्ययात्रेवर वीज कोसळली. वीज पडून अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.