संस्थापक संपादक : बाळ ठाकरे | संपादक : उध्दव ठाकरे | कार्यकारी संपादक : संजय राऊत

आज दिवसभरातील ४ टॉप स्टोरीज

पाकिस्तानी कलाकारांच्या सुरक्षेपेक्षा देशातील नागरिकांना सुरक्षेची हमी द्या!
पाकिस्तानी कलाकारांच्या सुरक्षेपेक्षा देशातील नागरिकांना सुरक्षेची हमी द्या!
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचे सर्वच फॅन आहेत. त्यांच्या कलेला विरोध नाहीच, पण पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून बेछूट गोळीबार करायचा, देशाच्या रक्षणासाठी जवानांनी छातीवर गोळ्या झेलायच्या आणि इथे पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमांनी मनोरंजन करायचे हे चालणार नाही. ....
राधे मॉंला अटकपूर्व जामीन
राधे मॉंला अटकपूर्व जामीन
हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या आणि सत्र न्यायालयाने जामीन नाकारलेल्या आध्यात्मिक गुरू राधे मॉंला उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी राधे मॉंला २५ हजारांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर ....
हिंदु-मुस्मिल भाई-भाई, गरिबीशी एकजुटीने लढा!
हिंदु-मुस्मिल भाई-भाई, गरिबीशी एकजुटीने लढा!
नवादा, दि. ८ (वृत्तसंस्था) - उत्तर प्रदेशात गोमांसाच्या अफवेवरून एका मुसलमानाच्या झालेल्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये हिंदू-मुस्लिम भाई-भाईचा संदेश दिला. या दोन्ही समाजांनी आपसात लढण्याऐवजी देशातील गरिबीच्या विरोधात एकजुटीने लढावे, अशी हाकही त्यांनी दिली. ते एका प्रचार सभेत बोलत होते. ....
कश्मीर विधानसभेत बीफ पार्टीवरून हाणामारी
कश्मीर विधानसभेत  बीफ पार्टीवरून हाणामारी
जम्मू, दि. ८ (वृत्तसंस्था) - अपक्ष उमेदवाराने दिलेल्या बीफ पार्टीवरून जम्मू-कश्मीरमध्ये हाणामारी झाली. भाजपच्या आमदारांनी पार्टी आयोजित करणारे अपक्ष आमदार शेख अब्दुल राशिद यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले. विधानसभेत झालेल्या हाणामारीवर सर्व स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ....

आणखी बातमी »

मुंबई

सदिच्छा भेट
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.

पुणे

विद्यार्थी नव्हे तर शिक्षकच खरे नापास
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - शिक्षण पद्धतीमध्ये एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, तर त्याला नापास ठरविता. विद्यार्थ्याला आपणच झापड लावतो. त्यामुळे तो विद्यार्थी नापास नसतो, खरं तर तुम्हीच नापास असता.
सदिच्छा भेट

सदिच्छा भेट

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.

पाकिस्तानी कलाकारांच्या सुरक्षेपेक्षा देशातील नागरिकांना सुरक्षेची हमी द्या!

पाकिस्तानी कलाकारांच्या सुरक्षेपेक्षा देशातील नागरिकांना सुरक्षेची हमी द्या!

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचे सर्वच फॅन आहेत. त्यांच्या कलेला विरोध नाहीच, पण पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून बेछूट गोळीबार करायचा, देशाच्या रक्षणासाठी जवानांनी छातीवर गोळ्या झेलायच्या आणि इथे पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमांनी मनोरंजन करायचे हे चालणार नाही.

पाकिस्तानची नाकेबंदी करा!

राजकारण वेगळं व क्रीडा-कला प्रांत वेगळे असं विभाजन होऊ शकत नाही. संबंध सुधारा, त्या दृष्टीनं पावलं उचला, तुमचा सद्हेतू कळू द्या, मग सगळं सुरळीत होतं की नाही पहा. आम्ही (पै.) नुसरत फतेह अली, (पै.) मेहदी हसन व गुलाम अली यांना इकडे डोक्यावर घ्यायचं आणि तिकडे तुमच्या काळ्या कारवाया तुम्ही निर्वेधपणे चालू ठेवणार. ऐसा नही हो सकता जनाब. एकेक नस आवळूनच पाकिस्तानला नाक रगडायला लावायला हवं,

अध्यादेश कसले काढता, बेकायदा प्रार्थनास्थळे जमीनदोस्त करा!

अध्यादेश कसले काढता, बेकायदा प्रार्थनास्थळे जमीनदोस्त करा!

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - शहर आणि उपनगराबरोबरच राज्यात उभारल्या गेलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई न करता केवळ अध्यादेश काढणार्‍या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले. ही प्रार्थनास्थळे हटविण्यासाठी केवळ अध्यादेश काय काढत बसलात? त्या अध्यादेशानुसार तातडीने कारवाई करा.

विद्यार्थी नव्हे तर शिक्षकच खरे नापास

विद्यार्थी नव्हे तर शिक्षकच खरे नापास

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - शिक्षण पद्धतीमध्ये एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, तर त्याला नापास ठरविता. विद्यार्थ्याला आपणच झापड लावतो. त्यामुळे तो विद्यार्थी नापास नसतो, खरं तर तुम्हीच नापास असता.

गुलाम अलींचा पुण्यातील कार्यक्रमही रद्द

गुलाम अलींचा पुण्यातील कार्यक्रमही रद्द

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या दणक्यामुळे मुंबईपाठोपाठ पुण्यात होणारा पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवारी होणारा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा शिवसेना चित्रपट सेनेने देताच आयोजकांनी अवघ्या तासाभरात कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली.

प्रवेश नाकारलेल्यांना १६ पर्यंत प्रवेश द्या

प्रवेश नाकारलेल्यांना १६ पर्यंत प्रवेश द्या

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - आरटीईअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी पुन्हा फेरी घेऊन लॉटरी पध्दतीने पर्यायी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश द्या, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

कार टँकरवर आदळून वसईतील तीनजण ठार

कार टँकरवर आदळून वसईतील तीनजण ठार

भोर, दि. ८ (सा. वा.) - भरधाव वेगातील स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर आदळून मुंबईतील दोन कुंटुंबांतील पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले; तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील केळवडे फाटा येथील राजस्थानी हॉटेलसमोर आज दुपारी ही घटना घडली.

अवघे उद्योगजगत दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

अवघे उद्योगजगत दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतो आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना तुमच्या मदतीची गरज आहे. या शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योगपतींना केले. या आवाहनाला अवघ्या उद्योगजगताने उदंड प्रतिसाद दिला.

‘विको’चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन

‘विको’चे सर्वेसर्वा गजानन पेंढरकर यांचे निधन

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - सचोटी, प्रयोगशीलता आणि गुणवत्तेच्या जोरावर ‘विको’ हा मराठमोळा ब्रॅण्ड प्रस्थापित करून आयुर्वेद उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे आणि मराठी माणूस यशस्वीपणे उद्योग उभारून तो जगभरात नेऊ शकतो हे दाखवून देणारे ज्येष्ठ उद्योजक गजानन पेंढरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

हिंदु-मुस्मिल भाई-भाई, गरिबीशी एकजुटीने लढा!

हिंदु-मुस्मिल भाई-भाई, गरिबीशी एकजुटीने लढा!

नवादा, दि. ८ (वृत्तसंस्था) - उत्तर प्रदेशात गोमांसाच्या अफवेवरून एका मुसलमानाच्या झालेल्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये हिंदू-मुस्लिम भाई-भाईचा संदेश दिला. या दोन्ही समाजांनी आपसात लढण्याऐवजी देशातील गरिबीच्या विरोधात एकजुटीने लढावे, अशी हाकही त्यांनी दिली. ते एका प्रचार सभेत बोलत होते.

नारायण राणेंचा कणकवलीत पुन्हा पराभव!

नारायण राणेंचा कणकवलीत पुन्हा पराभव!

मालवण, दि. ८ (सा.वा) - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांना बंडखोर संदेश पारकर यांनी धोबीपछाड केले. शिवसेना-भाजपच्या पाठिंब्याने राणे गटाच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारत पारकर गटाने नगराध्यक्षपद काबीज केले.

कार्टुनचा फिल्मी करिष्मा

कार्टुनचा फिल्मी करिष्मा

सिनेमातल्या हिरोंना कार्टुन गेम्समधून खेळवून मन भरल्यानंतर कार्टुन’ मंडळींना हिरो करण्याचा फंडा हॉलीवूडमध्ये रूढ झाला आहे. ‘हिटमॅन : एजंट ४७’पासून आजच्या अँग्री बर्ड्सपर्यंत, ‘रॅचेड ऍण्ड क्लान्क’पासून ‘वॉरक्राफ्ट’पर्यंत व्हिडीओ गेम्सवर आधारलेले सिनेमा एकापाठोपाठ एक थिएटरवर आदळणार आहेत.

शार्प शूटर : आशा शेलार

शार्प शूटर : आशा शेलार

‘कला चूप बस...’ असं ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती जान्हवीची आई. अर्थात होणार ‘सून मी ह्या घरची’ या मालिकेतील अभिनेत्री आशा शेलार. - शाळा- सेवासदन सोसायटी गर्ल्स हायस्कूल, गावदेवी

उद्योगाची दुनिया : व्यवसाय वेअरहाऊसचा!

उद्योगाची दुनिया : व्यवसाय वेअरहाऊसचा!

तयार झालेलं उत्पादन ठेवण्यासाठी व त्याची क्वॉलिटी आणि क्वॉण्टिटी तशीच कायम राखण्यासाठी वेअरहाऊसची गरज भासते. उत्पादन आणि जेव्हा उत्पादनाची गरज या दोघामधलं जे अंतर असतं त्याचा गॅप भरून काढण्याकरिता वेअरहाऊसची संकल्पना मार्केटमध्ये आली.

‘कट टू’ जिंदगी : ग्रेट सिक्रेट

‘कट टू’ जिंदगी : ग्रेट सिक्रेट

वॉटर पार्कला एण्ट्रीसाठी वयोमर्यादा आहे का?’ मी म्हणाले, नाही हो आजी, कुठल्याही गोष्टीचा आनंद लुटायला कसली आली आहे वयोमर्यादा! फक्त ती गोष्ट आणि तिचा आनंद किती लुटावा त्यासाठी मर्यादा आखली की झालं.’

रोखठोक : नायकांच्या मरणाचा खल!

रोखठोक : नायकांच्या मरणाचा खल!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य शोधण्याचा खेळ पुन्हा नव्याने सुरू झाला. लालबहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूचे रहस्य शोधा, अशी मागणी त्यांच्या चिरंजीवांनी केली. आता इतर अनेक ‘नायकां’च्या मृत्यूची माती चिवडण्याची मागणी सुरू झाली. हे ‘खेळ’ आता थांबायला हवेत.

लक्षवेधी : दानउत्सव

लक्षवेधी : दानउत्सव

‘जॉय ऑफ गिव्हिंग’ म्हणून ओळखला जाणारा ‘दान उत्सव’ संपूर्ण देशभरात साजरा होत आहे. २ ऑक्टोबरपासून त्यांची सुरुवात झाली. २००९ मध्ये सामाजिक बांधिलकीमधून दुसर्‍याला आनंद देण्याच्या उद्देशाने हा सप्ताह सुरू झाला. सर्व कर्ग आणि कयोगटांतील नागरिक पैशांच्या स्करूपात नव्हे.

आधारभूत किमतीचा नवा वाद

आधारभूत किमतीचा नवा वाद

साखर उद्योग अनेक अडचणीवर मात करीत नवीन वर्षाच्या हंगामाला सामोरे जात आहे. हंगामाच्या प्रारंभी ऊसदरावरून संघर्ष ठरलेला असतो. परंतु या वर्षी ऊसदराऐवजी एफआरपी म्हणजे किमान आधारभूत किमतीचा मुद्दा कळीचा ठरू पाहतो आहे.

हवाई दलाचे आधुनिकीकरण

हिंदुस्थानी हवाई दलातील लढाऊ विमानांच्या तीन तुकड्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यातच सर्व प्रकारची नवी विमाने आणि हेलिकॉप्टरच्या सामीलीकरणाची प्रक्रिया गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेली आहे. त्याचा हवाई दलाच्या तयारीवर विपरीत परिणाम होत आहे.

पहिला दिवस मुंबईचा

पहिला दिवस मुंबईचा

मुंबई, दि. ८ (क्री.प्र.) - शार्दुल ठाकूर, बलविंदर संधू व धवल कुलकर्णीचा प्रभावी मारा... श्रेयस अय्यरने तडकावलेले धडाकेबाज अर्धशतक... अन् पंजाबच्या फलंदाजांची सुमार कामगिरी... मुंबई व पंजाब यांच्यामधील रणजी ट्रॉफीमधल्या ब गटातील लढतीचा पहिला दिवस या सर्व घटनांनी गाजला.

आमच्यासारखे आम्हीच...!

आमच्यासारखे आम्हीच...!

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - फुटबॉल जगतात पराक्रम गाजवणारे झाले बहु आणि होतील बहु, पण हुबेहूब माझ्यासारखी आणि अर्जेंटिनाचा ‘सुपरस्टार’ दिएगो मॅराडोनासारखी नेत्रदीपक कामगिरी साकारणारे फुटबॉलपटू आता होणे नाही

मिशेल काकडे करणार चारही दिशा पादाक्रांत

मिशेल काकडे करणार चारही दिशा पादाक्रांत

पुणे, दि. ८ (क्री. प्र.) - शारीरिक क्षमतेचा कस लागणार्‍या एन्ड्युरन्स स्पर्धेत हिंदुस्थानचा तिरंगा सातासमुद्रापार फडकाविणार्‍या पुणेकर मिशेल काकडे आता आणखी एका अद्भुत सफरीसाठी सज्ज झाल्या आहेत. ‘द क्वीन ऑफ एन्ड्युरन्स’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या ४६ वर्षीय मिशेल काकडे देशातील चारही दिशा पादाक्रांत करण्याच्या मोहिमेस २१ ऑक्टोबरपासून प्रारंभ करणार आहेत.

क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी योजनेची खेळाडूंना मोठी मदत

क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी योजनेची खेळाडूंना मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या टॉप ऑलिम्पिक पोडीयम (टीओपी) योजनेतील मदतीचा हिंदुस्थानी क्रीडापटूंना तयारीसाठी रिओ ऑलिम्पिकच्या मोठा लाभ होतोय.

जात दाखला बोगस आढळल्या निवडणूक लढविण्यास सहा वर्षे बंदी

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - बनावट जात दाखला तयार करून राखीव जागांवर निवडणूक लढविणार्‍यांना जरब बसावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या उमेदवाराचा जात दाखला पडताळणी समितीने अवैध ठरविल्यास त्या उमेदवाराचे नगरसेवक पद तर रद्द होणारच आहे.

शिक्षण मंडळ सभापतीपदी चेतन घुले

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - पिंपरी - चिंचकड महापालिका शिक्षण मंडळ सभापतीपदी चेतन घुले यांची तर उपसभापतीपदी नाना शिकले यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड सहा महिन्यांसाठी आहे.

शिवनेरीला एक्स्प्रेस-वेवर अपघात

शिवनेरीला एक्स्प्रेस-वेवर अपघात

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - एसटीच्या भरधाक शिकनेरी बसचा टायर फुटल्याने मुंबईला जाणारी बस पुण्याला जाणार्‍र्‍या खासगी बसला धडकली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाकर बुधकारी सकाळी आडोशी गाकाजकळ दोन बसमध्ये झालेल्या या अपघातात एक ठार, तर नऊजण जखमी झाले.

औंध-रावेत बीआरटीस मार्गावरील बसथांब्यांसाठी ६० लाखांचा वाढीव खर्च

औंध-रावेत बीआरटीस मार्गावरील बसथांब्यांसाठी ६० लाखांचा वाढीव खर्च

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - औंध - रावेत बीआरटीएस रस्त्याकर उभारण्यात आलेल्या बसथांब्यांसाठी काही ठिकाणी सुधारित कामे करण्यात आली. या कामांसाठी तब्बल ६० लाखांचा काढीक खर्च करण्यात आला आहे.