संस्थापक संपादक : बाळ ठाकरे | संपादक : उध्दव ठाकरे | कार्यकारी संपादक : संजय राऊत

आज दिवसभरातील ४ टॉप स्टोरीज

कश्मीरमध्ये दोन मराठी वीर शहीद
कश्मीरमध्ये दोन मराठी वीर शहीद
श्रीनगर, दि. १३ (वृत्तसंस्था) - जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांबरोबर कुपवाडा जिल्ह्यातील चकमकीत लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जवान शंकर चंद्रभान शिंदे आणि कर्नाटकातील विजापूरचे सहदेव मोरे यांना वीरमरण आले. ....
पालघरमध्ये ६२ टक्के मतदान
पालघरमध्ये ६२ टक्के मतदान
पालघर, दि. १३ (प्रतिनिधी) - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत ६२ टक्के मतदान झाले. मतदारराजाने दुपारी बारानंतर मतदान केंद्राबाहेर उत्स्फूर्त गर्दी करीत मतदानाचा हक्क बजावला. ....
भाजप महाछत्तरबाज!
भाजप महाछत्तरबाज!
तासगाव, दि. १३ (सा. वा.) - शिवसेनेशी २५ वर्षांची युती पाच मिनिटांत तोडणारे तुमची स्थिती काय करतील? तुम्हाला ते फसवतील असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सावध केले होते. त्यांचा इशारा खरा ठरला. या आधीचे काँगे्रस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार चोर होते. ....
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर आज चार तासांचा ब्लॉक
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर आज चार तासांचा ब्लॉक
पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - कर्जत रेल्वे स्टेशन येथे रस्त्याच्या कामासाठी गर्डर्स टाकण्यात येणार असल्याने उद्या (दि. १४) सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून दुपारी तीन वाजून २० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांंच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ....

आणखी बातमी »

मुंबई

शाळांच्या सहली आर्ट गॅलरींमधघ्ये काढा!
मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - आर्ट म्हणजे ए-एजलेस, आर - रिलिजनलेस आणि टी- टाइमलेस आहे. सध्या सर्वांना आपल्या मुलांना इंजिनीअर, डॉक्टर बनवायचे आहे. पण रट्टे मारून मुलांची अवस्था रोबोसारखी होणार नाही याकडे लक्ष द्या. त्यांच्यातील माणूसपण जागे ठेवण्यासाठी कला हेच योग्य साधन आहे.

पुणे

विद्यार्थ्यांनी दिला प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश
पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - मुळा-मुठेच्या किनारी सकाळपासूनच शाळेतल्या चिमुकल्यांचे हात पुणेकरांनी केलेला प्लॉस्टिकचा प्रचंड कचरा गोळा करताना दिसत होते... तर दुसरीकडे जाणकार, सुशिक्षित मंडळी निर्माल्यांच्या पिशव्या हातांनी भिरकावत होती...

पश्चिम महाराष्ट्र

वेटरने घातला हजारो शेतकर्‍यांना कोट्यवधींचा गंडा
पंढरपूर, दि. १३ - चौदा महिन्यांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ‘जागृती’ शेळीपालन कंपनीचा मालक राज गायकवाड साडेचार महिने जेलची ‘हवा’ खाल्ल्यानंतर जामिनावर सुटला आहे. जेलमधून सुटका झाल्याने या भामट्याने सुटकेचा नि:श्‍वास टाकला असेल.

संभाजीनगर

रेड्याच्या मूर्तीची महिलांनी केली पूजा
पैठण, दि. १२ (सा.वा.) - संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदवून घेतल्याच्या घटनेला आज ७२९ वर्षे पूर्ण झाली. शूद्र, बहिष्कृत व स्त्रियांना वेदोच्चार बंदी असताना ‘माऊलीं’नी थेट प्राण्याकडून वेदमंत्र वदवून घेतले अन् पैठणच्या कर्मठ ब्राह्मणांच्या धर्मपीठाला आव्हान दिले.
शाळांच्या सहली आर्ट गॅलरींमधघ्ये काढा!

शाळांच्या सहली आर्ट गॅलरींमधघ्ये काढा!

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - आर्ट म्हणजे ए-एजलेस, आर - रिलिजनलेस आणि टी- टाइमलेस आहे. सध्या सर्वांना आपल्या मुलांना इंजिनीअर, डॉक्टर बनवायचे आहे. पण रट्टे मारून मुलांची अवस्था रोबोसारखी होणार नाही याकडे लक्ष द्या. त्यांच्यातील माणूसपण जागे ठेवण्यासाठी कला हेच योग्य साधन आहे.

१९व्या मजल्यावरून महिला पडली

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - १९ व्या मजल्यावरून पडल्याने शमिता तांबे (३०) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी कफ परेड येथे घडली. खिडकीत बसलेली असताना अचानक तोल जाऊन शमिता खाली पडली. मेकर टॉवरच्या ए विंगमध्ये रमेश भोजवाणी हे १९ व्या मजल्यावर राहतात.

गोरेगाव पत्रा चाळ घोटाळा अहवाल सादर करण्यास मुदतवाढ द्या!

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - गोरेगाव पश्‍चिम येथील पत्रा चाळ पुनर्विकासाच्या प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्यास गृहनिर्माण विभागाने मुदतवाढ मागितली आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले होते.

फुलांच्या सान्निध्यात सेल्फी पॉइंट

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - सेल्फी काढण्यासाठी चांगली बॅकग्राऊंड शोधणार्‍या मुंबईकरांनी आज फुलांच्या सान्निध्यात सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सहकार्याने वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी दिला प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश

विद्यार्थ्यांनी दिला प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश

पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - मुळा-मुठेच्या किनारी सकाळपासूनच शाळेतल्या चिमुकल्यांचे हात पुणेकरांनी केलेला प्लॉस्टिकचा प्रचंड कचरा गोळा करताना दिसत होते... तर दुसरीकडे जाणकार, सुशिक्षित मंडळी निर्माल्यांच्या पिशव्या हातांनी भिरकावत होती...

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय परिषद

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटतर्फे १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित ‘इनक्युबेशन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

मनसे आमदार सोनवणे आणि कार्यकर्त्यांकडून तलाठ्याला मारहाण

नारायणगाव, दि. १३ (सा. वा.) - वाळूउपसा करणार्‍यांना रोखल्यामुळे जुन्नरमधील मनसेचे आमदार शरद सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलाठ्याला बेदम मारहाण केली. सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक होत नाही तोपर्यंत बेमुदत ‘काम बंद’ ठेवण्याचा इशारा तालुका तलाठी संघटनेने दिला आहे. काल सायंकाळी ही घटना घडली.

आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य डॉ. कराडांनी केले

आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य डॉ. कराडांनी केले

पुणे : संतपरंपरेचा वारसा जपत डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी ज्ञान-अध्यात्माची सांगड घालून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेल्या डॉ. कराड यांनी स्वामी विवेकानंदांना अपेक्षित आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य केले आहे

पहिल्याच दिवशी २१ हजार कोटींचे करार!

पहिल्याच दिवशी २१ हजार कोटींचे करार!

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) - जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून हिंदुस्थानी अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या महोत्सवात पहिल्याच दिवशी २१४०० कोटी रुपयांचे करार झाले.

पालघरमध्ये ६२ टक्के मतदान

पालघरमध्ये ६२ टक्के मतदान

पालघर, दि. १३ (प्रतिनिधी) - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत ६२ टक्के मतदान झाले. मतदारराजाने दुपारी बारानंतर मतदान केंद्राबाहेर उत्स्फूर्त गर्दी करीत मतदानाचा हक्क बजावला.

हाफिज-लखवीचे कुणीही वाकडे करु शकत नाही!

हाफिज-लखवीचे कुणीही वाकडे करु शकत नाही!

मुंबई, दि. १३ (वृत्तसंस्था) - लष्कर-ए-तोयबाचे म्होरके हाफिज सईद आणि झकी-उर-रेहमान लखवी यांचे पाकिस्तानात कुणीही वाकडे करू शकत नाही असे आपणास साजिद मीर याने छातीठोकपणे फार पूर्वीच सांगितले आहे, अशी माहिती मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हीड कोलमन हेडली याने दिली.

भाजप महाछत्तरबाज!

भाजप महाछत्तरबाज!

तासगाव, दि. १३ (सा. वा.) - शिवसेनेशी २५ वर्षांची युती पाच मिनिटांत तोडणारे तुमची स्थिती काय करतील? तुम्हाला ते फसवतील असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सावध केले होते. त्यांचा इशारा खरा ठरला. या आधीचे काँगे्रस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार चोर होते.

जीवनगाणे : आवाज की दुनिया

जीवनगाणे : आवाज की दुनिया

आवाजाच्या या दुनियेने माझं आयुष्य अत्यंत समृद्ध केलं आहे. या माझ्या आवाजाच्या दुनियेत आपलं स्वागत! आपण हे वाक्य मनात वाचताना आपल्याही मनात एक ध्वनी उमटला असेल यात वाद नाही. श्रावाज की दुनिया के दोस्तो!

गॉगल्स डे

गॉगल्स डे

तुझ्या डोळ्यावर येता गॉगल... त्याचीच आता होते गझल...! कोणाचा कोण म्हणून गेला पण त्यातले खरे पण मात्र आता बोचायला लागलंय... कधीकधी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यावर बसलेला गॉगल आज फॅशन आयकॉन होऊन बसलाय... इतर फॅशन अ‍ॅसेसरीजच्या मते कानामागून येऊन तिखट झालाय...

खास बात : स्पंदन रेऽऽऽ

खास बात : स्पंदन रेऽऽऽ

पे्रम म्हणजे काय, एखादी व्यक्ती आवडणं, त्याच्याशी सारखं बोलावंसं वाटणं, त्याला भेटावंसं वाटणं आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण त्याच्या सोबतच जगता येणं.. या भावना तुमच्या आमच्या दोघांच्याच नव्हे, तर प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रेमी युगुलाच्या त्याच असतात.

अँकर : तो सोशल, हळवा कट्टा!

अँकर : तो सोशल, हळवा कट्टा!

आता विश्‍व सोशल झालंय. सोशल लिखाणामुळे व्हॉटस्अ‍ॅपचे आज चाळिसेक ग्रुप आहेत आणि त्यात ३०-३५ मेंबर्स. सतराशे साठ ओळखी आणि महिन्याला दहा गेटटुगेदर्स. जे करतो त्याला फन अ‍ॅक्टिव्हिटीचे नाव देतो. सगळीच मज्जा असते एकंदर.

रोखठोक : विज्ञान, अज्ञान आणि चमत्कार!

रोखठोक : विज्ञान, अज्ञान आणि चमत्कार!

सियाचीनमधील हिमकड्याखाली गाडलेला जवान हनमंतअप्पा सहा दिवसांनंतर जिवंत सापडला. हा चमत्कार असल्याचे मानून संपूर्ण देशाने नमस्कारासाठी हात जोडले होते. परंतु मृत्यूशी झुंज देत असताना त्याची प्राणज्योत मालवली. हिंदुस्थानात तेहतीस कोटी देव आहेत.

लक्षवेधी : हिमस्खलन नैसर्गिक आपत्ती

लक्षवेधी : हिमस्खलन नैसर्गिक आपत्ती

सियाचीन ग्लेशियरमधील हिमस्खलनात आश्‍चर्यकारकरीत्या काही दिवस बचावलेल्या हनमंतअप्पा यांचा जीव बर्फातील हवेच्या पोकळीमुळे वाचल्याची माहिती समोर आली. हिमस्खलन झाल्यानंतर हनमंतअप्पा बर्फात ३५ फूट खोलवर तयार झालेल्या हवेच्या या पोकळीत सापडले.

त्रिकूट पर्वतावरील हिंदुत्व!

त्रिकूट पर्वतावरील हिंदुत्व!

जम्मू आणि कश्मीर असे या राज्याचे दोन सरळ सरळ भाग आहेत. जम्मू हिंदूबहुल तर कश्मीर मुस्लिमबहुल भाग आहे. सरकारनेही त्याचा स्वीकार करत हिवाळ्यात मंत्रालय जम्मूमध्ये असेल तर एरव्ही ते श्रीनगरमध्ये असेल असे ठरवले आहे. जम्मूतील हिंदुत्व तेथे पाऊल ठेवल्याक्षणी जाणवू लागते.

टिवल्या बावल्या : पुणेकरांना हेल्मेट घालताय?

टिवल्या बावल्या : पुणेकरांना हेल्मेट घालताय?

हेल्मेटच्या सक्तीनं पुण्यात गदारोळ झालाय. पुणेकरांवर कोणी काहीही लादू शकत नाही हे अजून कोणाला कसं कळत नाही? ‘केसरी’ कार्यालय असलेल्या गायकवाड वाड्यात प्रवेशालाच एक कमान आहे. तिथं लावलेल्या पाटीवर लिहिलंय - ‘सायकलवरून येणार्‍यांनी कमानीतून येताना सायकलवरून खाली उतरावे.’

जगज्जेतेपदाच्या चौकारासाठी हिंदुस्थानचा युवा संघ सज्ज

जगज्जेतेपदाच्या चौकारासाठी हिंदुस्थानचा युवा संघ सज्ज

मीरपूर : स्पर्धेत आतापर्यंत अजेय असलेला हिंदुस्थानी संघ आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला वेस्ट इंडीजचा संघ या प्रतिस्पर्ध्यांमध्ये उद्या (दि. १४) युवा विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. विक्रमी जगज्जेतेपदाचा चौकार ठोकण्याची हिंदुस्थानी संघ सज्ज असून, विंडीजलाही पहिल्या जगज्जेतेपदाची आशा वाटत आहे.

मालिका विजयासाठी हिंदुस्थान सज्ज

मालिका विजयासाठी हिंदुस्थान सज्ज

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर ‘टीम इंडिया’चे विमान पुण्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर धाडकन जमिनीवर आपटले; पण रांचीमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ‘टीम इंडिया’ने श्रीलंकेवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिळवत ट्वेण्टी-२० मालिकेत झोकात पुनरागमन केले.

वोग्सने एकाच दिवशी मोडले

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम वोग्सने एकाच सामन्यात सर डॉन ब्रॅडमन व विश्‍वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर या दोन महान क्रिकेटपटूंचे विक्रम मोडीत काढले. त्याने नाबाद राहत सर्वाधिक धावा करण्यामध्ये सचिनला मागे टाकले, तर १५ डावांमध्ये फलंदाजी सरासरीत ब्रॅडमन यांना पिछाडीवर टाकले.

पुणेरी पलटन-जयपूर पिंक पॅन्थर बरोबरीत

पुणेरी पलटन-जयपूर पिंक पॅन्थर बरोबरीत

पुणे : घरच्या मैदानावर खेळताना सोप्या वाटणार्‍या सान्यात ‘जयपूर पिंक पॅन्थर’ला बरोबरीत रोखण्यात ‘पुणेरी परलटन’ला यश आले. प्रत्येक मिनिटाला गुणसंख्या पुढे-मागे होत असल्यामुळे कब्बडीची कडवी झुंज या सामन्यात पुणेकरांना अनुभवायला मिळाली.

मैला शुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी ३२ कोटींचा खर्च

मैला शुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी ३२ कोटींचा खर्च

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) - चर्‍होली आणि ताथवडे येथे मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार असून त्यासाठी ३२ कोटी ५५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सात मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत.

मुलांना निसर्गाच्या रंगात न्हाऊ द्या

मुलांना निसर्गाच्या रंगात न्हाऊ द्या

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) - आजच्या काळात एकाच पठडीच्या शिक्षणामुळे मुलांवर जगण्याची बंधने आली आहेत. त्यांचं अस्तित्व जपाच, त्याचबरोबर त्यांना निसर्गाच्या सार्‍या रंगात न्हाऊ द्या, असे आवाहन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केले.

सांगवीत मुळा नदीलगतच्या रस्त्यासाठी ८८ लाखांचा खर्च

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) - सांगवी येथे मुळा नदीलगतचा रस्ता विकास आराखड्यानुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदादर दीड कोटी अपेक्षित धरण्यात आला. मात्र, निविदादरापेक्षा तब्बल ४० टक्के कमी दराने निविदा सादर करणार्‍या ठेकेदाराला या रस्त्याचे काम देण्यात येणार आहे.

निगडी-स्वारगेट मेट्रोसाठी ५ हजार ३३३ कोटींचा खर्च

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) - निगडी ते स्वारगेट या साडेसोळा किलोमीटर मार्गावर मेट्रो धावणार असून, त्यासाठी ५ हजार ३३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर वनाज ते रामवाडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार ७९४ कोटी रुपये खर्ची पडणार आहेत.