संस्थापक संपादक : बाळ ठाकरे | संपादक : उध्दव ठाकरे | कार्यकारी संपादक : संजय राऊत

आज दिवसभरातील ४ टॉप स्टोरीज

ज्येष्ठ शायर, गझलकार निदा फाजली यांचे निधन
ज्येष्ठ शायर, गझलकार निदा फाजली यांचे निधन
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - ‘होश वालों को खबर क्या’, ‘तू इस तरह से मेरी जिंदगी मे शामील है’, ‘चुप तुम रहो चुम हम रहे’, ‘आभी जा आभी जा’ अशा हृदयस्पर्शी गझल-गीतांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ उर्दू शायर आणि गझलकार निदा फाजली यांचे आज निधन झाले. ....
कश्मीरमध्ये जाऊन हेडली युद्ध छेडणार होता!
कश्मीरमध्ये जाऊन हेडली युद्ध छेडणार होता!
मुंबई, दि. ८ (वृत्तसंस्था) - खरे तर कश्मीरमध्ये जाऊन मला हिंदुस्थानच्या लष्कराशीच युद्ध छेडायचे होते; ‘‘पण तुझ्यावर याहीपेक्षा धाडसी मोहिमेची जबाबदारी आम्हाला टाकायची आहे. ....
लादेन जिवंत!
लादेन जिवंत!
मॉस्को, दि. ८ (वृत्तसंस्था) - अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ठार केलेला कुख्यात दहशतवादी ओसाबा बिन लादेन जिवंतच आहे, असा खळबळजनक खुलासा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने केला आहे. ....
‘नेट न्यूट्रॅलिटी’ लागू होणार
‘नेट न्यूट्रॅलिटी’ लागू होणार
नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना खास ऑफर देऊन कंटेन्टनुसार वेगवेगळे दर यापुढे आकारता येणार नाहीत. कोणतीही इंटरनेट सेवा वापरा; दर समान राहणार. ....

आणखी बातमी »

मुंबई

बोरिवलीत चड्डी-बनियन गँगशी पोलिसांची नऊ तास चकमक
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - पहाटे तीनची वेळ. वृद्ध महिलेला लुटून चड्डी-बनियन गँगचे दरोडेखोर पळत होते. बोरिवलीतील शिंपोलीच्या जंगलात काळ्याकुट्ट अंधारात पोलीस त्यांच्या मागावर होते. दरोडेखोरांकडून दगडफेक, पोलिसांकडून गोळीबार.

पुणे

॥ सोन्याची जेजुरी ॥
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी दुपारी खंडोबागडावरून पालखी सोहळ्याने ‘कर्‍हा’स्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी ‘यळकोट यळकोट जय मल्हार!’च्या जयघोषात मोठ्या प्रमाणात भंडार्‍याची उधळण करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात शिवसेनेच्या ६९ हुतात्म्यांना अभिवादन
कोल्हापूर, दि. ८ (प्रतिनिधी) - बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करू. हुतात्मा झालेल्या ६९ शिवसैनिकांचेही बलिदान सार्थ करू, अशी शपथ मराठी भाषक सीमाभागात घेण्यात आली.

संभाजीनगर

महाराष्ट्र दिनापूर्वी आयुक्तालयाचे विभाजन!
संभाजीनगर, दि. ८ (प्रतिनिधी)- संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभाजनाचा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन महाराष्ट्र दिनापूर्वी घेण्याचा विचार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
बोरिवलीत चड्डी-बनियन गँगशी पोलिसांची नऊ तास चकमक

बोरिवलीत चड्डी-बनियन गँगशी पोलिसांची नऊ तास चकमक

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - पहाटे तीनची वेळ. वृद्ध महिलेला लुटून चड्डी-बनियन गँगचे दरोडेखोर पळत होते. बोरिवलीतील शिंपोलीच्या जंगलात काळ्याकुट्ट अंधारात पोलीस त्यांच्या मागावर होते. दरोडेखोरांकडून दगडफेक, पोलिसांकडून गोळीबार.

भायखळा येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास मार्गी

भायखळा येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास मार्गी

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - भायखळा येथील बीआयटी चाळींच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने विकासकांना इरादापत्र दिले असून आता या चाळींचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे.

बेस्टला आर्थिक सहाय्य केल्याशिवाय अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाही!

बेस्टला आर्थिक सहाय्य केल्याशिवाय अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाही!

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी या वर्षीही तरतूद केल्याशिवाय अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाही असे आश्‍वासन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आज बेस्ट समितीला दिले.

महापालिकाच देवनार डंपिंगच्या कचर्‍याची विल्हेवाट लावणार

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) — देवनार डंपिंग ग्राऊंडची देखभाल करणार्‍या कंत्राटदाराचे कंत्राट महापालिका प्रशासनाने रद्द केले असून आता महापालिकाच देवनार डंपिंगच्या कचर्‍याची विल्हेवाट लावणार आहे. त्यासाठी ४७४५ पाळ्यांसाठी महापालिका भाडेतत्त्वावर बुलडोझर घेणार आहे.

॥ सोन्याची जेजुरी ॥

॥ सोन्याची जेजुरी ॥

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी दुपारी खंडोबागडावरून पालखी सोहळ्याने ‘कर्‍हा’स्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी ‘यळकोट यळकोट जय मल्हार!’च्या जयघोषात मोठ्या प्रमाणात भंडार्‍याची उधळण करण्यात आली.

‘मायक्रोसॉफ्ट’च्या नावाने कॉल सेंटरद्वारे अमेरिकनांना फसविणारी टोळी गजाआड

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - अस्खलित इंग्रजी... प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देण्याची तत्परता... आणि ‘व्हीव्हीआयपी’ कॉलद्वारे संवाद साधत पुण्यातून थेट अमेरिकन नागरिकांना गंडा घालणार्‍या टोळीला सायबर सेलच्या पोलिसांनी गजाआड केले.

आझम कॅम्पससमोर ‘बोंब मारो’ आंदोलन

आझम कॅम्पससमोर ‘बोंब मारो’ आंदोलन

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, प्राचार्य तसेच सहलीशी संबंधित अधिकारी, शिक्षकांवर ‘मुरूड’ दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचातर्फे ‘बोम्ब मारो आंदोलन’ करण्यात आले.

खंडणीखोरांनी किरकोळ व्यापार्‍यांना केले ‘गिर्‍हाईक’

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) - शहरातील किरकोळ व्यापार्‍यांकडे खंडणी मागण्याचे प्रकार वाढले असून, व्यापार्‍यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. खंडणीखोरांनी व्यापार्‍यांनाच ‘गिर्‍हाईक’ करण्याच्या या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने त्यांची दखल घेत पोलिसांनी मेळावा घेऊन खंडणीखोरांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

मुंबई-ठाण्यातील पुलांखालील पार्किंग बंद करा!

मुंबई-ठाण्यातील पुलांखालील पार्किंग बंद करा!

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - उड्डाणपुलांखाली केल्या जाणार्‍या पार्किंगची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पुलाखाली होणारी कार पार्किंग बंद करा, असा आदेशच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने आज राज्य सरकारला दिला.

मराठी माणसांवर कानडीची सक्ती होतेय ही असहिष्णुता नाही काय?

मराठी माणसांवर कानडीची सक्ती होतेय ही असहिष्णुता नाही काय?

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) — असहिष्णुतेच्या नावाखाली देशात ‘पुरस्कार वापसी’चा प्रवाह वाहतोय. पण बेळगाव कारवार सीमाभागात मराठी माणसाला मराठी बोलू दिले जात नाही. त्यांच्यावर कानडीची सक्ती केली जाते. ही असहिष्णुता नाही का, असा खणखणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

पंकज भुजबळ यांची आज चौकशी

पंकज भुजबळ यांची आज चौकशी

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सदन घोटाळा व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री छगन भुजबळ कुटुंबीयांवरील कारवाईला गती दिली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या समीर भुजबळ यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.

ज्येष्ठ शायर, गझलकार निदा फाजली यांचे निधन

ज्येष्ठ शायर, गझलकार निदा फाजली यांचे निधन

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - ‘होश वालों को खबर क्या’, ‘तू इस तरह से मेरी जिंदगी मे शामील है’, ‘चुप तुम रहो चुम हम रहे’, ‘आभी जा आभी जा’ अशा हृदयस्पर्शी गझल-गीतांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ उर्दू शायर आणि गझलकार निदा फाजली यांचे आज निधन झाले.

जीवनगाणे : कसे प्यावे... त्यांचे सूर

जीवनगाणे : कसे प्यावे... त्यांचे सूर

सोशल मीडियामुळे प्रत्येकालाच आपले विचार मांडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. एका अर्थानं त्यामुळे विचारांचं एक लोकशाहीकरण झालं. रूढ माध्यमांची मक्तेदारी संपली आणि प्रत्येकाला आपापलं म्हणणं जगापुढे मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. पण यामुळे साहित्यचोरीही वाढली. इतरांच्या फेसबुकच्या पोस्ट, विनोद, कविता आपलंच साहित्य म्हणून लोक खपवू लागले.

खास बात : अंगठी रे...

खास बात : अंगठी रे...

स्टाईल सिम्बॉल झालेल्या टॅटूच्या प्रेमात लव्हबर्ड्स पडले असून एकमेकांची केवळ नावंच नव्हे तर कुठे भेटलो किंवा पहिल्या डेटच्या आठवणीची निशाणी कोरण्याची फॅशन सध्या बहरात आली आहे. अनामिकेत अंगठी घातली की वाञनिश्‍चय झाला असं समजायचा काळ गेला. आता टॅटूची अंगठी हा प्रेमातला नवा बदल आहे.

हौशीने शिकणार त्याला आयआयटी शिकवणार

हौशीने शिकणार त्याला आयआयटी शिकवणार

‘रट्टा मत मार... काबील बन, कामियाबी तो झक मार के पिछे आएगी...’ सिनेमातला डायलॉग तिथंच संपतो अन् तरुणाईचं रुटीन पुन्हा तसंच धावायला लागतं... तीच शाळा, तेच कॉलेज, तीच परीक्षा आणि तीच रट्टा मारण्याची स्टाईल... हे कुठेतरी बदलायला हवं... आयआयटीचे ‘काबील बन’ हे तत्त्व तरुणाईत रुजायला हवे. त्यासाठीच आयआयटीने ‘मुक्स’ कल्पनेला जन्म दिलाय... आयआयटीची कल्पना आहे... ती तेवढीच भन्नाट असणार!

अँकर : वाह पंडितजी

अँकर : वाह पंडितजी

हार्मोनियमच्या पट्ट्यावरून ज्यांची बोटे वयाच्या ८१व्या वर्षी आजही तरुणाईला लाजवतील अशा सफाईने फिरतात. संगीत हेच जीवन... त्याचीच उधळण करत तरुणाईच्या मनामनात संगीत रुजवणार्‍या पंडित तुळशीदास बोरकर यांना ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर त्यांच्या संगीतसुरांनी भारलेल्या गझलकाराने व्यक्त केलेली कृतज्ञता... वाह... पंडितजी वाह...!

रोखठोक : टिळक, आगरकर आणि खडसे!

रोखठोक : टिळक, आगरकर आणि खडसे!

टिळक-आगरकरांची पत्रकारिता इतिहासजमा झाली, पण त्याच महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या रूपाने पत्रकारितेची नवी परंपरा उदयास आली. पाकिटे दिल्याशिवाय बातम्या छापल्या जात नाहीत, असे खडसे म्हणतात. त्यांचा कोणी साधा निषेध केला नाही. कारण खडसे खरेच बोलत आहेत.

लक्षवेधी : भरती-ओहोटीतला थरार

लक्षवेधी : भरती-ओहोटीतला थरार

मुरुड - जंजिरा येथील समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या पुण्यातल्या आबेदा इनामदार महाविद्यालयाचे १४ विद्यार्थी बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आणि पुन्हा एकदा समुद्रकिनार्‍यावरील सुरक्षितता, स्वत: घेण्याची खबरदारी याकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष यावर चर्चा सुरू झाली.

जातपंचायतीचा अमानुष विळखा

जातपंचायतीचा अमानुष विळखा

महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत जातपंचायतींबाबत सक्षम कायदा होणे गरजेचे आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. या कायद्याअभावी आज लाखो जीव अमानुष शिक्षेला, बहिष्काराला बळी पडत आहेत.

टिवल्या बावल्या : ओळख

टिवल्या बावल्या : ओळख

माझे ज्येष्ठ स्नेही व ‘साहित्यिक फिरक्या’ कार्यक्रमातील मान्यवर सहकारी (कै.) वि. आ. बुवा म्हणायचे, ‘समारंभात प्रमुख पाहुण्याची ओळख करून देणारा सोडून बाकी सगळे त्याला चांगला ओळखत असतात.’ अगदी खरं आहे.

‘नंबर वन’च्या सिंहासनाची लढाई

पुणे, दि. ८ (क्री. प्र.) - गहुंजेतील एमसीए स्टेडियमवरील लढतीने हिंदुस्थान-श्रीलंका टी-२० क्रिकेट मालिकेस उद्या, ९ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे. या मालिकेकडे टी-२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून बघितले जात असले तरी महेंद्रसिंग धोनीच्या हिंदुस्थानला ‘नंबर वन’चे सिंहासन राखण्यासाठी ही मालिका जिंकावीच लागणार आहे.

बलाढ्य हिंदुस्थानपुढे श्रीलंकेचे आव्हान

मिरपूर, दि. ८ (वृत्तसंस्था) - फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली दबंगगिरी कायम ठेवणार्‍या आणि स्पर्धेत बाद फेरीपर्यंत पराभवाचे तोंड न पाहणार्‍या हिंदुस्थानचा १९ वर्षार्ंखालील युवा क्रिकेट संघ उद्या मंगळवारी युवा विश्‍वचषक उपांत्य लढतीत दुसरा आशियाई दिग्गज संघ श्रीलंकेशी झुंजणार आहे.

तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकांची हॅटट्रिक

गुवाहाटी/शिलाँग, दि. ८ (वृत्तसंस्था) - यजमान हिंदुस्थानी खेळाडूंनी १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट सोमवारीही सुरूच ठेवली. तिरंदाजीमध्ये तर हिंदुस्थानी खेळाडूंनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साजरी करून आजचा दिवस गाजवला.

पाटणा पायरेट्स, बेंगाल वॉरियर्स यांच्यात काँटे की टक्कर

कोलकाता, दि. ८ (वृत्तसंस्था) - स्टार स्पोर्टस् प्रो कबड्डी स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामात सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक करणारे पाटणा पायरेट्स, बेंगाल वॉरियर्स मंगळवारी आमनेसामने येत आहेत.

प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाला भाजपचा विरोध

प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाला भाजपचा विरोध

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) वाल्हेकरवाडी येथील नियोजित गृहप्रकल्पाला भाजपने तीव्र विरोध केला आहे.

गॅसगळतीमुळे सिलिंडरच्या स्फोटात चिमुरडीसह चारजणी भाजल्या

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) - गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद न केल्यामुळे गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात तीन महिलांसह चारजणी गंभीररीत्या भाजल्या. ही दुर्घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास पिंपळे- गुरव येथील पवनानगरमध्ये घडली.

पिंपरी-चिंचवडवर सीसीटीव्हीची ‘नजर’

पिंपरी-चिंचवडवर सीसीटीव्हीची ‘नजर’

पिंपरी, दि. ७ : पिंपरी-चिंचवड शहर आता संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगराणीखाली येणार आहे. महापालिकेने सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय यापूर्वी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा ऑप्टिक फायबरद्वारे जोडण्यात येणार आहे.

आता एका क्लिकवर उपलब्ध होणार पुजारी, पंडितजी

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा, लग्न, वास्तुशांती आहे; पण त्यासाठी पंडीतजी, पुजारी मिळत नाही. काळजी नको, कारण आजच्या इंटरनेटच्या जमान्यात केवळ एका क्लिकवर हे पुजारी, पंडितजी आपल्या शुभकार्याला उपलब्ध होणार आहेत.