अबब! काजू, बदाम, मनुक्यांचा 126 किलोचा मोदक, वर चांदीचा वर्ख

dry-fruits-modak

सामना ऑनलाईन । पुणे

गणरायाचे आगमन झाल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्यात सारे भक्त रंगले आहेत. या दहा दिवसांत विविध पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. आज गणपती बाप्पाला चक्क 126 किलो वजनाच्या मोदकाचा नैवेद्य दाखणवण्यात येणार आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. सूकामेव्यापासून बनवण्यात आलेल्या या मोदकाला चांदीचा वर्ख चढवण्यात आला आहे.