उरणच्या चैतन्य पाटील याची 14 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड


सामना प्रतिनिधी, उरण

तालुक्यातील चैतन्य पाटील या खेळाडूची महाराष्ट्राच्या 14 वर्षांखालील क्रिकेट संघाच्या 30 जणांच्या चमूत निवड करण्यात आली आहे. चैतन्य हा राज्याच्या क्रिकेट संघात निवड झालेला उरणचा पहिला खेळाडू आहे. तो उरण क्रिकेट स्पोर्टस् असोसिएशनतर्फे खेळतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या इन्विटेशन निवड चाचणीत खेळताना चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतकांसह चार डावांत 234 धावा केल्या होत्या. 86 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.