मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला लैंगिक छळाचा गुन्हा

5

सामना ऑनलाईन । कोलकाता

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ झाली आहे. शमीची बायको हसीन जहाँ हिने त्याच्याविरोधात केलेल्या छळाच्या आरोपांवरून कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. शमी विरोधात हुंड्यासाठी छळ करणे, लैंगिक अत्याचार असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मोहम्मद शमीवर घरघुती त्याची बायको हसीन जहाँने घरघुती हिंसाचारासहित अनेक गंभीर आरोप केले होते. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता तसंच शमी आणि त्याच्या नातेवाईकांमुळे शारीरिक आणि मानसिक हिंसेला सामोरं जावं लागलं असल्याचंही हसीनचं म्हणणं आहे. याखेरीज शमीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही तिने केला होता. याप्रकरणी हसीनने शमीविरोधात पोलिसात तक्रार केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या