अग बाई अरेच्चा! हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..

4

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनमधल्या एका महिलेला कानाचा विचित्र आजार झाला आहे. साधारणपणे कानाच्या आजारांमध्ये ऐकू न येण्यासारखा आजार आपण ऐकला असेल. मात्र, फक्त पुरुषांचाच आवाज ऐकू येत नाही, महिलांचा आवाज ऐकू येतो अशा विचित्र आजाराने चीनमधली चेन नावाची महिला त्रस्त आहे.

काही दिवसांपूर्वी एके सकाळी चेन जेव्हा झापेतून उठली, तेव्हा तिला तिच्या बॉयफ्रेंडचा आवाज एकू येत नव्हता. त्यामुळे ती ताबडतोब रुग्णालयात गेली. चेनची समस्या ऐकल्यावर डॉक्टर देखील हैराण झाले. मात्र सखोल तपासणी केल्यानंतर चेन ‘रिव्हर्स हिअरींग लॉस’ सारख्या आजाराने पीडित असल्याचे निदर्शनास आले. याला ‘लो फ्रिक्वेन्सी हिअरींग लॉस’ असेही म्हटले जाते. Storypic या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानूसार चेनवर उपचार करणारी महिला डॉक्टर सांगते की, “मी जेव्हा तिच्यावर उपचार करत होती त्यावेळी ती माझा आवाज ऐकू शकत होती, मात्र बाजूला बसलेल्या एका पुरुषाचा आवाज तिला ऐकू येत नव्हता.” महिलांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ही पुरुषांच्या आवाजापेक्षा जास्त असते त्यामुळे तिला पुरुषांचे आवाज ऐकू येत नसल्याचे डॉक्टरने सांगितले.

कानाच्या आजारापासून पीडित असलेल्या साधारण 13 हजार रूग्णांमधून एखाद्या रूग्णास अशाप्रकारची समस्या उद्भवू शकते असेही डॉक्टरने सांगितले. सततचा ताण आणि अपूऱ्या झोपेमुळे हा आजार होऊ शकतो. तसेच अनुवांशिकतेमुळे  या आजाराची लागण होऊ शकते असे कान-नाक-घसा विशेषज्ञ डॉ. लिन शियाक्विंग यांनी सांगितले आहे. तसेच चेनवर योग्य उपचार सुरू असून तिला लवकरात लवकर बरे केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.