Honour Killing बिहारमध्ये ‘सैराट’, मुलीच्या कुटुंबीयांनी प्रेमी युगुलाच्या शरीराची केली खांडोळी

15


सामना ऑनलाईन । गया

बिहारमधील गयामध्ये मुलीचे जातीबाहेरील मुलासोबत प्रेम संबंध असल्याने तिच्या कुटुबीबीयांनी  दोघांचा हत्या केली आहे. दोघांचा खून केल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी दोघांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते जाळून नदीत फेकले.  पोलिसांना नदीतून दोघांच्या शरीराचे अवशेष अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले आहे.

गयामध्ये एका मुलीचे दुसर्‍याच जातीतल्या मुलाशी प्रेमसंबध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हती आणि त्यांनी तिला प्रियकराशी न भेटण्यास सांगितले. मुलीने जेव्हा घरच्यांना नाही जुमानले तेव्हा त्यांनी दोघांना संपवण्याचे ठरवेल. मुलीच्या घरच्यांनी दोघांचा खून केला आणि शरीराचे तुकडे तुकडे केले. हे तुकडे जाळून त्यांनी नदीत फेकले. पोलिसांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मुलीचे वडिल, भाऊ आणि काकाला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या