गुजरातमध्ये ‘जीएसटी’चा जन्म!

सामना ऑनलाईन । सूरत

१ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे काही लोक एवढे प्रभावी झाले आहेत की, आपल्या मुलांची नावं जीएसटीप्रमाणे ठेवू लागली आहेत. गुजरातच्या सूरतमधील कांचन पटेल या महिलेने आपल्या मुलींची नावं जी, एस, टीनुसार ठेवली आहेत. या महिलेनं आपल्या मुलींची नावं गारावी, सांची आणि तारावी अशी ठेवली आहेत. ज्याची पहिली इंग्रजी अक्षरं जीएसटी अशी होतात.

कांचन पटेल यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरू केलेल्या जीएसटी- एक टॅक्स, एक देश या संकल्पनेतून मी एवढी प्रभावित झाले की मी माझ्या मुलींची नावं त्याप्रमाणे ठेवली आहेत. जीएसटीवरून नावं ठेवण्याची पहिली घटना नाही. याआधी ३० जूनच्या रात्री ज्यावेळी जीएसटी लागू होणार होता, त्यावेळी राजस्थानमध्ये जन्मलेल्या एका मुलीचं नाव जीएसटी ठेवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे छत्तीसगढच्या बैकुंठपूरमध्ये १ जुलैला जन्माला आलेल्या एका मुलीच नावही जीएसटी ठेवण्यात आलं होतं.