12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मदरशामध्ये बलात्कार, मौलवीला अटक

208

सामना ऑनलाईन । मेरठ

देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव नाही. ताजी घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील असून येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मदरशातील मौलवीने बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी मदरशातील मौलवीला अटक करण्यात आली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मेरठ जिल्ह्यातील खेरीकला गावात असणाऱ्या मदरशामधील एका खोलीत नेऊन मौलवीने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलीने किंचाळ्या मारल्यावर इतर विद्यार्थिनींनी तिकडे धाव घेतली आणि मौलवीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधाराचा फायदा घेऊन मौलवी फरार झाला. या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी मेरठ-करनाल महामार्गावर बसची वाट पाहात असताना आरोपी मौलवीला अटक केली असून पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अल्पवयीन मुलींना बनवले जात आहे शिकार
देशात अल्पवयीन मुलींना विकृतांकडून शिकार बनवले जात आहे. कानपूरमध्ये रविवारी एका मदरशा शिक्षकाने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आरोपीचे नाव जावेद असल्याचे उघड झाले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणे यूपीच्या श्यामलीमध्ये दोन व्यक्तींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी सुहेल आणि सोनम फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. महाराष्ट्रातही नागपूरमध्ये 4 वर्षीय चिमुरडीवर 25 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

आपली प्रतिक्रिया द्या