स्वतःच्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणं गैर नाही, मौलवीचं संतापजनक वक्तव्य

सामना ऑनलाईन । काहिरा

इस्लाममध्ये आपल्याच अनौरस मुलीशी शरीरसंबंध ठेवण्याची परवानगी आहे, असं संतापजनक वक्तव्य इजिप्तमधील एका मौलवीने केलं आहे. इमाम अल-शफी असं या इमामाचं नाव आहे. अनैतिक संबंधांतून जन्माला आलेल्या मुलींचा बापाशी कोणताही संबंध नसतो. त्यामुळे त्यांच्याशी शारीरिक संबंध किंवा लग्न करणं हे अजिबात गैर नाही, असं इमामाने म्हटलं आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अल अजहर विद्यापीठात शिकवणाऱ्या अल सेरसावी नामक माणसाने एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात अल-शफी याच्या विधानाबाबत दावा करण्यात आला आहे. अनैतिक संबंधांतून जन्माला आलेल्या मुलींना बापाचं नाव लागत नाही. त्यामुळे त्यांचं संबंधित पुरुषाशी बाप म्हणून नातं नसतं, असं शरिया कायदा मानतो. त्यामुळे तिच्याशी लैंगिक संबंध किंवा लग्न करणं यात काहीही गैर नाही, असं विधान या इमामाने केलं आहे.

हा व्हिडिओ २०१२मधला असून आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी संबंधित इमामावर टीकेची झोड उठवली आहे. इजिप्तच्या इमामांनी अशाप्रकारे संतापजनक वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही एका मौलवीने अशाच प्रकारचं विधान केलं होतं. टीव्हीवरील एका कार्यक्रमात शरियानुसार मुलींच्या लग्नाचं कोणतंही निश्चित वय नसल्यामुळे एखाद्या मुलीचा अर्भक अवस्थेतही विवाह करता येऊ शकतो, असं हा मौलवी म्हणाला होता.