हॉटेलमध्ये शौचालयास गेल्याने ‘जीएसटी’सह बील

सामना ऑनलाईन । इरोड

सार्वजनिक शौचालयाच्या वापरासाठी पैसे द्यावे लागतात हे माहित आहे, मात्र हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये शौचालयास गेल्यास बील आणि ते देखील जीएसटीसह देण्यात आले तर… आश्चर्य वाटले ना. मात्र तमिळनाडूतील इरोडमध्ये एका व्यक्तीने हॉटेलमधील शौचालयाचा वापर केला म्हणून जीएसटीसह बील आकारण्यात आले आहे. त्यामुळे एक देश एक कर असं म्हणत भाजप सरकारने लोकांच्या माथी मारलेल्या ‘जीएसटी’चा फायदा होण्याऐवजी त्रासच जास्त व्हायला लागला आहे, असेच बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या एका व्यक्तीला अचानक लघुशंका आली. आजूबाजूला सार्वजनिक शौचालय न दिसल्याने त्याने एका हॉटेलचे शौचालयाचा वापरले. काही वेळाने तो बाहेर आल्यानंतर त्याला हॉटेलच्या मॅनेजरने त्याला ११ रुपयांचे बील दिले. विशेष म्हणजे या बीलावर ५% जीएसटी करही आकारण्यात आला होता. सध्या शौचालय वापरण्यासाठी आकारण्यात आलेल्या या बिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

gst-washroom-bill

बाहेर फिरायला गेल्यानंतर अचानक लघुशंका किंवा शौचास आली आणि जवळपास एकही सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्यास हॉटेलमध्ये शौचालय वापरले जाते. त्यामुळे अनेक राज्य सरकारने एक नियम बनवत सार्वजनिक ठिकाणी महिला आणि लहान मुलांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये शौचालयाचा वापर करण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी पैसे देण्यात यावे असेही म्हटले होते.