एनएसजी कमांडोच्या घरातून रिव्हॉल्व्हर चोरणाऱ्यांना अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

एनएसजीमध्ये नेमणुकीला असलेले संदीप पंतवणे यांच्या घरातून जिवंत काडतुसांसह रिव्हॉल्व्हरची चोरी करणाऱया दोघांना पवई पोलिसांनी अटक केली. शमीम सलीम शेख आणि सादीक अली शेख अशी चोरट्यांची नावे असून १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पवईतील शिवकृपा सोसायटीमध्ये संदीप आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ५ सप्टेंबरला चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. सोन्याचे दागिने, चार हजार रोकड याच्यासह २० जिवंत काडतुसे आणि ०.३२ ची रिव्हॉल्व्हर चोरली. संदीप यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी संदीप यांच्या सोसायटीजवळील म्हाडा कॉलनीतून शमीम आणि सादीक या दोघांना अटक करण्यात आली.