त्याच्या अंगात खिलजी घुसला, पद्मावत पाहताना तरुणीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । हैदराबाद

चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना तेलगंणा येथे घडली आहे. रिकामं चित्रपटगृह आणि अंधाराचा फायदा घेत आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप एका १९ वर्षीय तरुणीने केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर ते दोघेही तेलंगणा येथील प्रशांत थिएटरमध्ये पद्मावत हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटाच्या खेळासाठी अतिशय तुरळक प्रेक्षक होते. त्याचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेवर बलात्कार केला.

या घटनेत तरुणी जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.