आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी, बॅनरबाजी नको!

10

सामना प्रतिनिधी । मुंबई

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे ‘मातोश्री’ निवासस्थानी युवा सैनिकांची प्रचंड गर्दी होणार आहे. मात्र शुभेच्छा देण्यासाठी युवा सैनिकांनी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या १३ जून रोजी साजऱया होणाऱ्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र या वर्षी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे बॅनर लावू नयेत, असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या कानाकोपऱयातून ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिक आणि युवा सैनिक शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा संख्येने येणार आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात येणार आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये फळेवाटप, खाऊवाटप, मिठाईवाटप असे उपक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहनही युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या