‘आम्ही बेफिकर’मध्ये देवरूप शर्मा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कॉलेज गोइंग मित्रांची धमाल कथा असलेल्या ‘आम्ही बेफिकर’ 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचे असून सुयोग गोऱहे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता देवरूप शर्मा कॉलेजमधील भाईच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनयासोबत पटकथा आणि संवाददेखील त्यानेच लिहिले आहेत. देवरूप याने ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. भूमिकेबाबत देवरूप म्हणाला, चित्रपटात माझी भूमिका निगेटिव्ह असली तरी रोमान्स, इमोशन, कॉमेडी असे वेगवेगळे पदर या भूमिकेला आहेत. अभिनयासोबतच त्याला नृत्याचीदेखील आवड आहे. आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी नृत्याचे धडे दिले आहेत.