विराटला अनुष्काचं ‘हे’ वागणं अजिबात आवडत नाही

सामना ऑनलाईन । मुंबई

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत टॉपवर आहे. पण मैदानासह मैदानाबाहेरही त्याची चर्चा अधिक आहे ती अनुष्कासोबतच्या त्याच्या नात्यामुळे. मात्र या दोघांमध्ये कसं नातं आहे, याचा खुलासा त्यानं नुकताच एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. अनुष्कावर भरभरून बोलताना मात्र विराटनं तिच्याबद्दल त्याला न आवडणारी एक गोष्ट ही सांगितली.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा कार्यक्रम होस्ट करत होता. ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेच्या संघाला पराभूत करणाऱ्या कोहलीने या कार्यक्रमात आपलं आयुष्य आणि अनुष्का शर्माबाबत काही खास खुलासे केले आहेत. खरं तर या दोघांनी अद्याप सार्वजनिकरित्या आपल्या नातं जाहीर केलं नसलं तरी ही जोडी लोकप्रिय असून नेहमीच चर्चेत असते.

विराट आणि अनुष्का अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. हाच धागा पकडत आमीरने विराटला अनुष्काबद्दल विचारलं. तिची आवडं विचारल्यावर अनुष्काचा प्रामाणिकपणा आणि काळजी घेणं मला आवडतं, असं विराट म्हणाला. मात्र आम्ही जेव्हा भेटायचं ठरवतो तेव्हा अनुष्का नेहमी १०-१५ मिनिटं उशिरा येते. ते मला अजिबात आवडतं नाही, असं त्यानं सांगितलं.

मी उत्तम माणूस बनलो, याचं श्रेय हे अनुष्काला जातं असंही तो म्हणाला. या कार्यक्रमादरम्यान कोहलीने आमीर खानचे जो जीता वही सिकंदर, थ्री इडियट्स आणि पीके हे चित्रपट खूप आवडत असल्याचं देखील सांगितलं.